file photo 
मराठवाडा

...अखेर अजय बाहेतीला जामीन, धान्य घोटाळा प्रकरण

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यभर गाजलेल्या धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा कंपनी मालक अजय बाहेती याला तब्बल आठ महिण्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. जी. अवचट यांनी चार कोटी रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी व शर्थीवर ता. १८ डिसेंबर रोजी जामीन दिला. मात्र दोन आठवड्याच्या आत एक कोटी व दरमहा ५० लाख रुपये नायगाव न्यायालयात जमा करणे बंधनकारक आहे. असे नाही झाल्यास त्याला पुन्हा अटक करण्यात येईल असे आदेशात नमुद केले आहे.

कृष्णूर (ता. नायगाव) येथील एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची इंडिया मेगा फुड नावाची कंपनी आहे. या कंपनीत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून त्यावर आधारीत अन्न पदार्थ तयार करण्याची कंपनी आहे. परंतु या कंपनीत जिल्हा पुरवठा विभाग व धान्य वितरण करणारी यंत्रणा हाताशी धरुन शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे ते थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत. सर्व सामान्याच्या व गरींबाच्या तोंडचा घास हिरावत असल्याची गुप्त माहिती तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली. त्यांनी अत्यंत गोपनियता बाळगत त्यांनी आपल्या विशेष पथकांमार्फत मेगा फुड या कंपनीत ता. १८ जूलै २०१८ रोजी छापा टाकला. 

एक कोटी एक लाखाचा मुद्देमाल जप्त
 
कंपनीतून दहा ट्रक शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ जप्त केले होते. जवळपास एक कोटी ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कुंटूर पोलिस ठाण्यात ११ ट्रक चालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडीया, वाहतुक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खूराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्याकडून राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला. 

अजूनही सातजण हर्सुल कारागृहात

सीआयडीच्या पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकांनी ता. १० मे २०१९ रोजी मुख्य आरोपी अजय बाहेती, ललित खूराणा, राजू पारसेवार आणि ओमप्रकाश तापडीया यांना अटक कली. तेंव्हापासून ते हर्सुल कारागृहात शासकिय पाहूणचार घेत होते. त्यानंतर याच प्रकरणात एक जून २०१९ रोजी पुरवठा विभागाचे रमेश भोसले, रत्नाकर ठाकूर, गोडाऊनकिपर श्री. विप्तल आणि श्री. शिंदे यांना अटक केली. ता. सहा जून २०१९ रोजी या गुह्याचे पहिले दोषारोपपत्र (१४५० पान) ८० साक्षिदारांसह नायगाव न्यायालयात दाखल केले.

आठ महिण्यानंतर अजय बाहेती सुटला

शेवटी अजय बाहेती यानी जामीन मिळावा म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या अर्जावर मंगळवारी (ता. तीन) न्यायमुर्ती श्री अवचट यांनी सुनावणी घेतली. यावेळी त्यांना चार कोटी रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यापैकी एक कोटी रुपये दोन आठवड्याच्या आत व दरमहा ५० लाख रुपये नायगाव न्यायालयात जमा करावे. अशा अटीवर जामीन दिला आहे. सध्या हा तपास पोलिस उपाधिक्षक व्ही. एस. साळुंखे व आर. एम. स्वामी यांचे पथक करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT