vikrant gojamgunde and chandrakant birajdar
vikrant gojamgunde and chandrakant birajdar  
मराठवाडा

लातूर महापालिकेची आर्थिक घडी बसवणार

हरी तुगावकर

लातूर : महापौर आणि उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर आमच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. लातूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महापालिकेला गती देण्यासाठी वेळ लागणार आहे. लातूरकरांनी थोडा संयम बाळगावा. नवं व वैभवशाली लातूर करण्याचा आमचा मानस आहे; पण त्याकरिता पैसे लागणार आहेत.

महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. लातूरकरांच्या सहकार्यातून ही आर्थिक घडी बसविण्यात येणार आहे. शंभर दिवसांचा विकासाचा अजेंडा आहे. याकरिता प्रसंगी सर्वांना विश्वासात घेऊन कटू निर्णय घेण्यात येतील, अशी भूमिका पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी स्पष्ट केली आहे. 

शहराला पाण्यात स्वयंपूर्ण बनवू 


रेल्वेने पाणी आल्याने लातूरची जगभर बदनामी झाली आहे. ही ओळख पुसून काढून शहराला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा मानस आहे. याकरिता पाणी वितरण व वापर याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याकरिता लातूरकरांच्या सूचनाही घेण्यात येणार आहेत. दहा दिवसांचा पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 

"अमृत'च्या कंत्राटदारावर फौजदारी 


अमृत पाणीपुरवठा योजनेत कंत्राटदाराने काम अर्धवट सोडत माघार घेतली आहे. त्याच्या कामांमुळे अनेक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे; पण सर्व चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे श्री. गोजमगुंडे यांनी सांगितले. 

प्रभावी कचरा व्यवस्थापन 


कचरा व्यवस्थापन विस्कळित झालेले आहे; पण येत्या काळात या कचरा व्यवस्थापनाची आधुनिकतेकडे वाटचाल दिसेल. प्रत्येक घराला कार्ड दिले जाणार आहे. त्याला क्‍यूआर कोड असेल. प्रत्येकाच्या दारात घंटागाडी गेली की नाही हे सर्व्हिलन्स रूममध्ये कळेल, असे त्यांनी सांगितले. 

करात सुसूत्रता आणणार 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
महापालिकेला मालमत्ता तसेच पाणी करातूनच उत्पन्न मिळते. हे उत्पन्न वाढविण्यासाठी लातूरकरांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले जाणार आहेत. यात सुसूत्रता आणण्यात येणार आहे. एमआयडीसी, बाजार समितीच्या मालमत्ता करासंदर्भात चर्चा सुरू आहेत. योग्य मार्ग निघेल असे ते म्हणाले. 

तीस दिवसांत डेंगीमुक्त लातूर 


शहरात गेल्या काही महिन्यांपासून डेंगी आणि चिकुनगुण्याचे रुग्ण वाढलेले आहेत. यात पूर्ण क्षमतेने काम करून तीस दिवसांत डेंगीमुक्त लातूर करण्यात येणार आहे. महापालिकेकडून रक्ताच्या नऊ चाचण्या निःशुल्क करण्यात येत आहेत. शहरातील डॉक्‍टरांनीदेखील रुग्णांना माफक शुल्क आकारावे, असे आवाहन त्यांनी केले. 

30 कोटींची कामे सुरू करणार 


तीस कोटींचा विकास निधी पडून आहे. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याचे असमान वाटप केल्याने आम्ही न्यायालयात गेलो होतो. यात आता नवीन कामाची निवड करण्यात येईल. नगरसेवकांच्या सूचना घेऊन निधी वितरण करण्यात येणार आहे. गंजगोलाईचा विकास आराखडा तयार असून गूळ मार्केट येथे बहुमजली पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तेथून गंजगोलाईत फिरण्यासाठी मोफत मिनी बस सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. गोजमगुंडे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT