food grains hike wheat tur dal rates edible oil unseasonal rain hingoli agriculture esakal
मराठवाडा

Food Grains Hike : गहू, तूर डाळीच्या दरात वाढ; खाद्य तेलात किंचित घट, वर्षभराच्या धान्य खरेदीला वेग

यंदा एप्रिल महिन्यातील दहा ते १२ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्राहकांनी साठवणुकीच्या धान्य खरेदीकडे पाठ फिरवली

राजेश दारव्हेकर

हिंगोली : यंदा एप्रिल महिन्यातील दहा ते १२ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्राहकांनी साठवणुकीच्या धान्य खरेदीकडे पाठ फिरवली होती. आता ऊन तापू लागल्याने धान्याच्या बाजारात चैतन्य आले असताना गहू, डाळीच्या दरात वाढ झाली आहे.

रब्बीतील शेतमाल काढणीनंतर शेतकरी आर्थिक निकड, साठवणुकीअभावी धान्य बाजारात विक्रीसाठी आणतात. मागणी, आवक दोन्ही बरोबर असल्याने किफायतशीर दराने वर्षभराचे धान्य खरेदी करणे कामगारांना, कष्टकरी नोकरदारांना शक्य होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धान्य खरेदीला वेग येतो. राज्यासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचा रंग आणि पोषकतेवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटातून गहू पीक वाचवून लवकर काढणी केली आहे. यामुळे गहू ओला असण्याची शक्यता होती. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने धान्य खरेदीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एप्रिल महिन्यात बाजारात शांतता होती. आता ऊन तापू लागल्याने ग्राहकांची बाजारात वर्दळ वाढली आहे.

अनेकांनी वर्षभराचे नियोजन करताना गहू खरेदीनंतर दोन ते चार दिवस कडक उन्हात गहू, डाळ वाळू घातली जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातून गव्हाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. पावसामुळे गव्हाचे उत्पादन कमी झालेले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद आहे.

मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाव वाढू लागले आहेत. आठ दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाची तर तूर डाळीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. तूर डाळ ठोक बाजारात १२० ते १२५ रुपये किलो तर गहू ३० ते ३२ रुपये किलो झाला आहे. तर, १५ लिटर सोयाबीन तेलाचा डब्बा २८०० ऐवजी २५०० रुपयांना मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे मध्यंतरी बाजारात धान्य खरेदी पूर्णपणे मंदावली होती. आता ऊन चांगले तापू लागल्याने ग्राहक धान्य खरेदी करीत आहेत. बाजारातील वर्दळ वाढलेली आहे. मागणी वाढल्याने गेल्या आठ दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाची तर डाळीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ झालेली आहे.

तूर डाळीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या दरात किंचित घसरण झालेली आहे.

— दीपक बासटवार, सचिव, किराणा मर्चंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT