Jalna News esakal
मराठवाडा

जालन्यात थरार ! व्यावसायिकाला मारहाण करुन वाहन कालव्यात लोटून दिले

दुचाकीवर जाणाऱ्या व्यावसायिकाला वाहनाने धडक दिली व त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

दिलीप दखने

वडीगोद्री (जि.जालना) : फोकलँड यंत्र भाड्याने लावायचे म्हणुन एकाला खंडणीसाठी ताब्यात घेऊन मारहाण केल्याची घटना वडीगोद्री (ता.अंबड) येथे बुधवारी (ता.२६) रात्री घडली. या विषयी माहिती अशी की, मादरमोई (जि.बीड) येथील व्यावसायिक कैलास आसाराम शिंगटे (रा.मादरमोई) हे गावाकडे फोकलँड चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांना २६ जानेवारी रोजी बोलावून आम्हाला फोकलँड भाड्याने लावायचे तुम्ही या म्हणुन तीन ते चार जणांनी बोलावले. त्या चौघांनी शिंगटे यांच्या मोटरसायकलला धडक देऊन जखमी केले व स्काॅर्पिओ गाडीत टाकले. गाडीत त्यांना दुपारी तीन वाजेपासून ताब्यात घेऊन मारहाण करुन वडीगोद्री येथे राष्ट्रीय महामार्गाने जायकवाडी डावा-कालवा चारी नंबर-१६ जवळ आले. तेथे सदरील स्काॅर्पिओ गाडी बंद पडली. त्या गाडीला कॅनालमध्ये लोटुन देण्यात आली व दुसरी गाडी बोलावुन तेथून ते परत औरंगाबाद (Aurangabad) रस्त्यावर आले.(Four Men Beaten Businessman In Wadigodri In Jalna District)

शिंगटे यांनी मला सोडा म्हणत जोरदार प्रतिकार केला व आपल्या मागे लोक येत आहेत हे लक्षात आल्यावर सौदलगाव (ता.अंबड) येथे बीड-औरंगाबाद रस्त्यावर शिंगटे यांना गाडीतून खाली लोटुन दिले. तिथे उपस्थिती नागरिकांना झालेला प्रकार शिंगटे यांनी सांगितला. माझे अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पाहुणे आहेत असे सांगितले. नंतर वडीगोद्री येथील नागरिकांनी शिंगटे यांना आधार देत मदत केली, अशी माहिती गोंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोपाल दिलवाले यांनी दिली.

गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहायक पोलीस उपनिरक्षक गजानन कौळासे, कर्मचारी गोपाल दिलवाले, कल्याण आटोळे, करांडे, कोलघोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंगटे यांना मारहाण झाल्याने वडीगोद्री येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सदरील घटनेतील संशयित आरोपी फरार झाले असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली.(Jalna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT