Freedom Fighter Suryabhanji Sitaramji Pawar dies in Hyderabad liberation struggle
Freedom Fighter Suryabhanji Sitaramji Pawar dies in Hyderabad liberation struggle 
मराठवाडा

हैद्राबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी सुर्यभानजी पवार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

पूर्णा (परभणी) : हैद्राबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी सुर्यभानजी सीतारामजी पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर वझूर (ता.पूर्णा ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वझूर येथील रहिवासी असलेले स्वातंत्रसैनिक सुर्यभानजी सितारामजी पवार (वय ९५ ) यांचे शनिवारी (ता.०६) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता.७) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी स्वतःचे योगदान दिले होते. तसेच रजाकाराला पळवून लावण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वझुर गावात मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीमध्ये आठ स्वातंत्रसैनिक होते. सात जणांचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांच्यापैकी सुर्यभानजी पवार हे शेवटचे साक्षीदार होते. 

तालुक्यात आण्णा या नावाने ते परिचीत होते. दत्त परंपरेतील श्री.पुरुषोत्तम उर्फ दासा स्वामी यांचे ते शिष्य होते. वारकरी संप्रदयातील निष्ठावंत वारकरी होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गुरुची परंपरा चालवली. शैक्षणिक, सामाजिक, ग्रंथालय, धार्मिक व आध्यात्मिक कार्यात त्यांनी शरिर थकेपर्यंत सहभाग नोंदवला. पूर्णा येथे वरिष्ठ महाविद्यालय त्यांच्या नावाने आहे. परभणी येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात्य पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार यांचे ते वडील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT