Ganeshotsav 2022 
मराठवाडा

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाला शैक्षणिक, सामाजिक कार्याची जोड

देवगाव खवणे परिसरात ‘अकरा गाव-एक गणपती’चा उपक्रम

सुहास सदाव्रते

जालना : उत्सव कुठलाही असो, त्याला उत्सवाचे स्वरूप न देता सामाजिक व शैक्षणिक कार्याची जोड दिल्यास परिवर्तन होवू शकते, असा आदर्श देणारे देवगाव खवणे ( ता.मंठा) हे गाव. गेली अकरा वर्षांपासून गणेशोत्सव काळात ‘अकरा गाव- एक गणपती’ स्थापना करीत एकजुटीने विधायक कार्यासाठी ग्रामस्थ वाहून घेतात हे विशेष. ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरात भव्य असे निवासी संस्कार प्रबोधिनी निवासी गुरुकुल विद्यालयही सुरू करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात वर्गणीवरून वाद-विवाद, ध्वनिक्षेपकाचा कर्णकर्कश आवाज असे चित्र अनेक भागात दिसते. हे चित्र बदलायला हवे, गणेशोत्सव हा विधायक कार्यासह साजरा व्हावा याचा संकल्‍प देवगाव खवणे ( ता.मंठा) परिसरातील ग्रामस्थांनी केला. दरम्यान, ओंकारेश्वर संन्यास आश्रमाचे महंत बालकगिरी महाराज यांच्या प्रेरणेने वर्ष २०१४ मध्ये स्वीकारला. परिसरातील अकरा गावांसाठी एक गणपती अशी संकल्पना पुढे आली.

विधायक आणि सकारात्मक विचाराला कृतीची जोड दिली पाहिजे, या आवाहनाला अकरा गावातील ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून देवगाव खवणे, अंभोरा,वैद्य वडगाव, गणेशपूर, वाघोडा, वरुड, टकले पोखरी, माहोरा, नायगाव वस्ती, पांढोरना या अकरा गावांनी मिळून एकच गणपती स्थापन केला जातो. गणेशोत्सव काळात भाविक कार्यक्रमांचे नियोजन करतात. प्रत्येक गावातर्फे श्रमदान केले जाते. दरम्यान, बुधवारी ( ता.३१) गणेशोत्सव सुरुवात होत आहे. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी एकजुटीने उभारले गुरुकुल

आठ वर्षांपासून सुरु असलेल्या या धार्मिक उत्सवाला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची जोड देण्यात आली आहे. ग्रामस्थ, भाविकांच्या एकजुटीतून येथे चार वर्षांपासून निवासी संस्कार प्रबोधिनी निवासी गुरुकुल सुरू करण्यात आले आहे. खरेतर दोनच वर्षात गुरुकुलात अध्यात्माबरोबर शिक्षणाची सांगड घातली आहे. दोन वर्षात १२० विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहे. भाविकांनी या शाळेसाठी मोठे योगदान देत १२ वर्गखोल्या बांधून दिल्या हे विशेष.

अध्यात्म शिक्षण

  • संस्कार वर्ग

  • काकडा

  • भजन,कीर्तन

  • हरिपाठ

  • धार्मिक ग्रंथाचा अभ्यास

  • संस्कृत भाषा अभ्यास

सामाजिक कार्य

  • सर्व रोग निदान शिबिर

  • रक्तदान शिबिर

  • कान तपासणी शिबिर

  • आरोग्य तपासणी शिबिर

  • वृक्षारोपण, संवर्धन

शैक्षणिक कार्य

देवगाव खवणे येथील संस्थानातर्फे निवासी संस्कार प्रबोधिनी गुरुकुल चालविले जाते. येथे इयत्ता ५ ते १० वर्ग चालतात. पुढील काळात याठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबत परंपरागत शिक्षण, मूल्यसंस्कार विद्यार्थ्यांना मिळत आहेत, हे विशेष.

सकारात्मक बदल

अकरा गावे एकच गणपती असल्याने गाव वर्गणीचा विचार नाही. प्रत्येक गावातून नियोजन करून दर दिवशी सेवा दिली जाते. अकरा गावासाठी एकाच ठिकाणी अन्नदान होते. पारंपारिक उत्सवाला आधुनिकतेची जोड दिल्याने किशोरवयीन मुलांमध्ये चांगले बदल दिसून येत आहे.

पारंपारिक गणेशोत्सवाला इथे सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची जोड दिली जाते.अकरा गावातील भाविक याचे निर्णय घेतात. ना कुठली वर्गणी, ना कुठली पावती.भाविक भक्ताचे हे सर्व आहे, सेवाधर्म म्हणून याठिकाणी प्रत्येक जण काम करतो.

- महंत बालकगिरी महाराज, श्री ओंकारेश्वर संन्यास आश्रम, देवगाव खवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT