Kalamba Local Crime Branch Police esakal
मराठवाडा

कळंब्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; जिवंत काडतूससह हत्यारे जप्त, अंधाराचा फायदा घेत दोघे पसार

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch Police) अटक केली.

दिलीप गंभिरे

पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे (वय ३५) याला अटक केली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांत (Yermala Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch Police) अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूलमधील जीवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवार (ता. २१) रात्री दीड वाजता केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण पसार झाले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे (वय ३५) याला अटक केली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांत (Yermala Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे हा त्याचे इतर ४ साथीदारांसह तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना २० मे रोजी मिळाली होती.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, सुभाष चौरे हे येरमाळा परिसरात रात्रगस्तीसाठी रवाना झाले होते. रात्रगस्त करत असताना मंगळवार ता. २१ रात्री दीडच्या सुमारास पोलिस पथक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चोराखळी शिवारातील कामत हॉटेलजवळ आले असता, या ठिकाणी ५ जण संशयित अवस्थेत आढळून आले. त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे जात असताना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले.

त्यांचा पाठलाग करुन ५ पैकी ३ जणांना ताब्यात घेतले. दोघेजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. यावेळी घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केली असता तेथे एका गावठी पिस्टलचे मॅगझिन मिळून आले. तसेच ३ जणांच्या हातात एक कत्ती व एक कटावणी मिळून आली. यावरुन हे शस्त्रासह दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची खात्री झाली.

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता विनोद शिवाजी जामदारे, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, जाधव नगर, पुणे मूळ गाव लोणारवाडी (ता परंडा, जि. धाराशिव), बाबासाहेब व्यंकट भायगुडे वय २५, साईनगर, कोराड वस्ती, हिंगणीपूर, पुणे. मूळ गाव वाटेफळ, ता परंडा, जि. धाराशिव, गणेश दिलीप मस्कर वय २५ वर्ष रा. स्वारगेट, पुणे अशी सांगितली. पळून गेलेल्या दोघांची आकाश सुभाष गाडे वय २७, रा. सिंहगड रोड, माणिक बाग, रामनगर, पुणे, समाधान आगलावे, वय २५, रा. माणकेश्वर, ता. परांडा, धाराशिव असे सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्यांची गुन्हेगारी अभिलेख तपासले असता, विनोद जामदारे याच्याविरुध्द सिंहगड पोस्टे येथे मोक्का, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट, जबरी चोरी, धमकी देणे असे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून २ वर्षाकरिता हद्दपार केले असून ८ मे पासून तो आंबी पोलीस ठाणे, धाराशिवच्या हद्दीमध्ये वास्तव्यास असल्याचे अभिलेखावरुन स्पष्ट झाले.

गणेश दिलीप म्हसकर व आकाश सुभाष गाडे यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे ६ गुन्हे पुणे येथे दाखल आहेत. पळून गेलेल्या दोघांबाबत माहिती घेतली असता आरोपी आकाश गाडे याच्या हातामध्ये गावठी पिस्टल होते. पिस्टल हाताळत असताना मॅगझिन घटनास्थळी पडली आणि सदरचा आरोपी आकाश गाडे हा पिस्टल घेऊन पळून गेला होता. सदर इसमास बार्शी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बार्शी परिसरात मॅगझिन नसलेल्या पिस्टलसह पकडले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT