Gangapur navratri durga visarjan traditional music with procession marathi news
Gangapur navratri durga visarjan traditional music with procession marathi news sakal
मराठवाडा

Navratri 2023 : गंगापूरात पारंपारिक वाद्य वाजवत दुर्गा देवीची सवाद्य विसर्जन मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

बाळासाहेब लोणे

गंगापूर : शहरात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीच्या वतीने पारंपारिक वाद्य वाजवत दुर्गा देवीची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात देवीची आरती करण्यात आली.

विशेष म्हणजे तरुण मुलींनी एकसारख्या वेशभूषेत ढोल तशांचा गजर केला. तालावर गुलालाची मुक्त उधळण झाली. संयोजन समितीच्या अध्यक्ष सुवर्णा जाधव, माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी चोख नियोजन केले.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा मोठ्या जल्लोषात ढोलकीच्या तालावर फटाक्यांची आतषबाजी गुलालाची मुक्त उधळण करत फुग्यांची आरास करून दुर्गा देवीची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

नवरात्रीनिमित्त मागील नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यमंत्री अदिति तटकरे, लावणी सम्राज्ञी अर्चना सांवत, गौतमी पाटील, अभिनेत्री मानसी नाईक, क्रांति नाना माळेगावकर यांनी भेट दिल्या. जिल्हा परिषदेचे मैदान परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून निघाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. महाराणा प्रताप चौक, गणपती मंदिर, जिजामाता चौक, मारुती चौकामार्गे विसर्जन मिरवणूक कायगाव गोदावरीच्या दिशेने गेली.

आरती व देवीचे पूजन करून मूर्तीला गोदावरी नदीत विसर्जित करण्यात आले. मिरवणूक यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, संतोष अंबिलवादे, माजी नगसेवक सुरेश नेमाडे, योगेश पाटील, कृष्णा पाटील, शरद दारुंटे, बाळू जाधव, अमोल बुरकुल, आकाश मोरे, अर्जुन कराळे, ऋषिकेश जोगदंड, ओंकार जाधव यांनी पुढाकार घेतला.

जाधव दांपत्याचा सपत्नीक सत्कार

शहरात मागील नऊ दिवस भागच्च कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उत्सव समितीच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव व त्यांचे पती माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचा शहरवासीयांनी नागरी सत्कार केला. कोरोना काळ सोडला तर जाधव दांपत्य मागील सात वर्षापासून प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवित असते. विशेष म्हणजे यंदा कार्यक्रमाची संपूर्ण थीम त्यांची उच्चशिक्षित मुलगी केनिषा संजय जाधव हिने डिझाईन केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: ठाण्यात नौपाडामधील ईव्हीएम मशीन बंद, मतदार संतापले

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT