मराठवाडा

कचऱ्याला सलग तिसऱ्या दिवशी आग

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात मर्यादा येत असल्याने महापालिकेकडून कचरा गाळे, उद्यानात साठवणुकीचा गंभीर प्रकार उघड झाला. सलग दोन दिवस नेहरू उद्यानात साठविलेल्या कचऱ्याला आग लावल्यानंतर तिसऱ्या दिवशीही काडी लावीत माथेफिरूंनी खोडसाळपणाचा कळसच गाठला.

गेल्या सहा महिन्यांपासून कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी अफलातून, नानाविध क्‍लृप्त्या लढविण्यात आल्या. महापालिकेच्या काही गाळ्यांत तसेच चक्क उद्यानात कचरा साठवून नंदनवनाऐवजी कचरापट्टी तयार करणे सुरू आहे. 

सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात कचरा संकलित करून तो चक्क पाच गाळ्यांत साठविल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला. नेहरू उद्यानात २५ नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर २६ व २७ नोव्हेंबरलाही पहाटेच्या वेळेतच आग लावण्यात आल्याने नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे.

कारवाई कधी?
नेहरू उद्यानात कचऱ्याला आग लावून प्रदूषणाला चालना देणाऱ्या तसेच बागेचे, परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्याविरुद्ध अद्याप गुन्हे नोंदविण्यात आलेले नाही. इतर ठिकाणीही आग लावणाऱ्यांवर तसेच कचरा अनधिकृतपणे साठवून आरोग्याला अपाय उत्पन्न करणाऱ्यांवरही ठोस कारवाई का केली जात नाही, असा नागरिकांच्या मनात सवाल आहे.

माजी सैनिकांना कचरा पेटवणाऱ्यावर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. कचरा पेटवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. आग लावणाऱ्यांवर लवकरच कारवाई होईल.
- श्रीकृष्ण भालसिंग, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT