sakal
मराठवाडा

हिंगोली : सिध्देश्वर धरणाचे बारा दरवाजे उघडले

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सलग चौथ्या दिवशीही शनिवारी ता. २५ नऊ वाजता धरणाच्या चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे उघडले असुन पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज ३०,९०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरण शंभर टक्के भरले असून पाण्याची आवक बघता बुधवार, गुरुवार, शुक्रवार धरणाचे बारा दरवाजे उघडून पुर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शनिवारी देखील सकाळी नऊ वाजता बारा दरवाजे उघडून पुर्णा नदी पात्रात ३०,९०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

धरणाचे आज एकुण चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये एक,दोन, तीन, चार,सहा, सात, आठ, नऊ, अकरा, बारा, तेरा व चौदा हे दरवाजे उघडून पाण्याचा पुर्णा नदी पात्रता विसर्ग केला जात आहे. दरम्यान मागच्या पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी देखील जिल्ह्यात पाऊस झाला होता. सिध्देश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावरून पुर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT