File photo 
मराठवाडा

चार्टनंतरही रेल्वेत मिळवा जागा : कशी ते वाचलेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : रेल्वेगाडीचा चार्ट म्हणजे अंतिम तक्ता. हा तक्ता तयार झाल्यावरही तुमचे तिकिट निश्चित झालेले नसेल आणि प्रतिक्षेत दाखवत असेल तर प्रवासी हतबल होतात व अनेकदा आणीबाणीची परिस्थिती उद्‍भवत असते. मात्र, रेल्वेने आता आयआरसीटीसीच्या संकेत स्थळातच नवा पर्याय उपलब्ध करून दिला असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

आसन क्रमांक शोधणे झाले शक्य
आता चार्ट तयार झाल्यावरही संबंधित गाडीत असलेल्या आरक्षित, अनारक्षित, अंशतः आरक्षित व रिकाम्या असलेल्या जागांबद्दलची माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे संकेतस्थळावरच प्रवासी आपला आसन क्रमांक शोधू शकतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नव्या सुविधेची माहिती नुकतीच जाहीर केली आहे.   

अशी वापरा नवीन सुविधा

  • आयआरसीटीसी संकेतस्थळावर लाॅगइन करा
  • गाडीतील आरक्षणाचा ताजा तक्ता दाखवा,असा नवा पर्याय असेल
  • त्यावर क्लिक करताच नवीन वेबपेज उघडेल
  • तेथे पीएनआर, नाव, प्रवासाचीतारीखव प्रवास सुरु करण्याच्यास्थानकाची माहिती भरा
  • आता संपूर्ण आरक्षणाचा तक्ता दिसू लागेल
  • डबा व श्रेणीच्या आधारे तुम्ही रिकाम्या जागांची माहिती मिळवू शकाल
  • आपल्याला हवा तो आसन क्रमांक भरून ती माहिती सेव्ह करा. त्या सीटवर बसण्याचा तुमचा मार्ग मोकळा झाला असे समजा.
  • प्रत्यक्ष प्रवासाआधी संबंधित माहिती दाखवाकिंवा त्याबाबतची नेमकी माहिती द्या. त्याच्याकडीलतक्त्यातही ती अपडेट झालेली असेल.

टीटी हाच होता अखेरचा पर्याय
आयआरसीटीसीच्या ई-तिकिट बुकींग रकान्यात वेब व मोबाईल या दोन्ही माध्यमातून नवी सुविधा उपलब्ध असणार आहे. सद्यस्थितीत तिकिट प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांचा  कोणतीही रेल्वेगाडी सुटण्याच्या आधी तिकिट तपासनिसाच्या (टीटी) भोवती प्रवाशांचा घोळका दिसतो. कारण तक्ता तयार झाल्यावरही आपले तिकिट वेटींगवरच असलेल्यांना टीटी हा अखेरचा पर्याय वाटत असतो.

ही प्रणालीही आहे सदोष 
अनेकदा तक्ता तयार झाल्यावरही रेल्वे सुटली, की अनेक जागा रिकाम्याच असल्याचेही वास्तव दिसते. त्यावर जागा मिळावी यासाठी टीटीला भेटणाऱ्यातील अनेक चेहरे दिसतात. असाही अनुभव प्रवाशांना येतो. आता आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिलेल्या नव्या तांत्रिक सुविधेमुळे प्रवाशांना तयार झालेल्या तक्त्याचाही आरसा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.  चार्ट तयार होताना त्यात वेटींग व आरएसीतील प्रवाशांना क्रमाने सामावून घेतले जाईल. मात्र ही प्रणालीही सदोष असल्याचे काही रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT