Girl Students death in college due to dizziness
Girl Students death in college due to dizziness 
मराठवाडा

महाविद्यालयात चक्कर आल्याने विद्यार्थिनीचा मत्यू

सकाळवृत्तसेवा

नांदेड : यशवंत महाविद्यालयात एमएस्सीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नेहा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीस आज दुपारी सोमवारी (ता. 18) बाराच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने चक्कर येऊन पडल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

ईतवारा परीसरात राहणारी नेहा चव्हाण यशवंत महाविद्यालय शिकत आहे. रोजच्याप्रमाणे नेहा महाविद्यालयात गेली. मात्र महाविद्यालयात आल्यावर तिला चक्कर आली. मित्र मैत्रिणीला काही कळायच्या आतच ती जमिनीवर कोसळली. त्यांनी नेहाला तात्काळ रिक्षात टाकून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्लोबल रूग्णालयात नेत असताना निधन झाले. तिच्या काही वर्गमित्र माहिती दिली की, अगोदरच नेहाची तब्येत बरी नसताना तिला महाविद्यालयात जाऊ नको, असे घरचे सर्व जण सांगत होते. असे असताना सुद्धा ती महाविद्यालयात आली होती. यावेळी तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिचा मृत्यू उन्हाच्या तीव्रतेमुळे झाला की आजारामुळे हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT