मराठवाडा

छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

तेर - शाळेत ये-जा करताना गावातील रोडरोमिओंकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःच्या राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना २८ जून रोजी हिंगळजवाडी (ता. उस्मानाबाद) येथे घडली. याप्रकरणी हिंगळजवाडीतील दोघांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगळजवाडीतील अल्पवयीन मुलीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. २८ जूनला राहत्या घरी तिने स्टोव्हमधील रॉकेल अंगावर ओतून घेत पेटवून घेतले होते. गंभीर भाजल्याने उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान एक जुलैला मृत्यू झाला. पीडित मुलीच्या वडिलांनी ढोकी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हिंगळजवाडी येथील सोमनाथ सुरेश वाकुरे व बाळू रमाकांत पिंपळे या दोघांविरुद्ध विनयभंग, छेडछाड करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. दरम्यान, तेरमध्ये शाळेत ये-जा करणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्याने महाराष्ट्र संत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी १५ जुलै रोजी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT