sakal
sakal
मराठवाडा

कनेरगावात ग्रामीण बँक मित्राची दोन लाखाची बँग चोरीला

सकाळ डिजिटल टीम

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बँक मित्र ( बी सी ऐजंट) यांची दोन लाख ८६ हजार रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना सोमवार ता १३ रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे बँक मित्र (बी सी एजंट) म्हणून सतीश गुंजकर व इतर दोघे मायक्रो एटीएमची काम करतात. गेल्या तीन दिवसांपासून बँकेला सुट्टी असल्याने बँक मित्रांकडे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. आज नेहमीप्रमाणे गुंजकर शाखेच्या बाजूला असलेल्या बागले यांच्या जागेमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणचे मायक्रो एटीएम काम करत होते.

आज आठवडी बाजार असल्याने व बँका बंद असल्याने यांच्याकडे पैशाचा भरणा करणाऱ्यांचे व पैसे काढणार्‍यांची गर्दी होती. सायंकाळी चारच्या सुमारास व्यवहार झाल्यानंतर गुंजकर यांनी आपल्या जवळची रोकड दोन लाख ८६ हजार रुपये मोजून बॅगेमध्ये ठेवली. व ही पैशाची बॅग ते बसलेल्या खुर्चीवरच पाठीमागे ठेवली. समोर टेबलवर वहीत आजचा व्यवहार नोंद केला. ही नोंद वही बॅगेमध्ये ठेवण्यासाठी मागे बघितले असता मागे बँग नसल्याचे आढळून आले.

आजूबाजूला शोध केल्यावरही पैशाची बॅग आढळून न आल्याने एकच गोंधळ झाला. लगेच पोलिस चौकीला ह्या घटनेची खबर दिली त्यानंतर त्वरित घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कनेरगाव चौकीचे यहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे, विजय कालवे यांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूला शोध सुरू केला. घटनेची खबर वरिष्ठांना दिली त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपाध्यक्ष विवेकानंद डाखोरे साहेब यांनी भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कनेरगाव चौकीला सुरू होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT