नांदेडला अडकलेल्या शीख भाविकांना अखेर मिळाली परवानगी  
मराठवाडा

शीख भाविकांचा जत्था पंजाबकडे रवाना

अभय कुळकजाईकर

नांदेड - पंजाब, हरियाणा आदी भागातून नांदेडला मुख्य सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आलेल्या जवळपास तीन हजार शीख भाविकांना लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून नांदेडला अडकून रहावे लागले. अखेर केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीने त्यातील पाचशे भाविकांचा जत्था रवाना झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंघ आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शीख भाविकांचा जत्था जात असताना मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे आदींची उपस्थिती होती. 

दहा खासगी बसद्वारे रवाना
लॉकडाऊनच्या आधी नांदेड येथे पवित्र श्री सचखंड हुजूरसाहेब गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी आलेले पंजाबमधील अनेक भाविक नांदेड येथे अडकले होते. त्यांना नांदेड येथून त्यांच्या मुळ राज्यामध्ये जाण्याची परवानगी हवी होती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंघ व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करुन त्यांना जाण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर दहा ट्रॅव्हल्समधून पाचशे शीख भाविकांचा जत्था गुरुवारी (ता. २३) पंजाबकडे रवाना झाला.

लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने अडचण 
पंजाब येथील अनेक शीख बांधव गुरुद्वारा परिसरात अडकले होते. त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था श्री सचखंड गुरुद्वारा यांच्यातर्फे करण्यात आली होती. परंतु लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे शीख भाविकांमध्ये बैचेनी निर्माण झाली होती. त्यांच्या मुळगावी त्यांना जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीची दखल घेवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक सल्लागार उपसमितीच्या बैठकीत शीख भाविकांचा विषय मांडला होता. त्यासोबतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे भाविकांना पंजाबमध्ये पाठविण्याची विनंती केली होती.

दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदिरसिंघ यांच्याशी संपर्क करुन नांदेड येथे अडकलेल्या भाविकांना पंजाबकडे पाठविण्याची परवानगी दिली. त्यांच्या या परवानगीनुसार हिंगोली येथील खुराणा ट्रॅव्हल्सचे मालक जगदीश खुराणा यांनी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वानुसार भाविकांना पंजाबकडे नेण्याची तयारी दाखविली. त्यानुसार गुरुवारी रात्री आठ वाजता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा कुलवंतसिंघजी यांनी भाविकांसाठी अरदास केली व सर्वांना शिरोपा प्रदान केला. त्यानंतर हा जत्था पंजाबकडे रवाना झाला. हा जत्था रवाना झाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंग यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. नांदेडमध्ये अडकलेल्या भाविकांना परत आणण्यासाठी काही अडचण आल्यास मदत करण्याची विनंती केली.

शीख भाविक रवाना
यावेळी बाबा कुलवंतसिंघजी, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, सदस्य मनप्रितसिंघ कुंजीवाले, गुरुमितसिंघ महाजन, भगिंदरसिंघ घडीसाज, गुरुचरणसिंघ घडीसाज, गुलाबसिंघ कंधारवाले, देवेंद्रसिंघ मोटारवाले, नवनिहालसिंघ जहागिरदार, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा आदींची उपस्थिती होती.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT