file photo 
मराठवाडा

वर्दीवर हात, चार जणांना बेड्या 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शासकिय कामात अडथळे निर्माण केला. ही घटना येवती (ता. मुखेड) या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

येवती (ता. मुखेड) येथे शुक्रवारी (ता. १७) कुस्ती दंगलीचा कार्यक्रम होता. या ठिकाणी बाहेरगावाहून या ठिकाणी मल्ल व भाविक येणार असल्याने मुखेड पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. मुखेड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गंगाधर साहेबराव चिंतोरे (वय ३५) हे आपल्या एका अन्य सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी कर्तव्यावर होते. दंगलीच्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून नाहक वाद घालत होते. वाद उफाळून येऊन कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून कर्तव्यावरील गंगाधर चिंतोरे हे आपल्या सहकाऱ्यासोबत वाद मिटविण्यासाठी पुढे गेले असता त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली. एवढेच नाही तर चक्क जमावाने पोलिसांना लाथबुक्यानी मारून दगडफेक करून गंभीर जखमी केले. 

जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश धुडकावले

एवढेच नाही तर या जमावाने जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश धुडकावून लावून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गंगाधर चिंतोरे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात परमेश्‍वर मार्तंड नरोटे, चंद्रकांत अशोक देवकते, आंगद सोपान देवकते, ज्ञानेश्‍वर मष्णाजी नरोटे, निनाद दिगांबर नरोटे, विठ्ठल बाबूराव नरोटे सर्व राहणार तारदवाडी (ता. मुखेड) यांच्याविरुध्द शासकिय कामात अडथळा व आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान मगरे करीत आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता. १७) रात्री यातील परमेश्‍वर नरोटे, चंद्रकांत देवकते, अंगद देवकते आणि ज्ञानेश्‍वर नरोटे यांना अटक केल्याचे श्री. मगरे यांनी सांगितले.  

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

नांदेड : शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना काकांडी (ता. नांदेड) शिवारात ता. १६ ते १७ जानेवारी दरम्यान घडली.
 
काकांडी येथील राहणारा विद्यार्थी हणमंत संतोष बागल (वय ११) हा खेळत- खेळत गावशेजारी असलेल्या शेतात पोहचला. त्याच शेतात असलेल्या तळ्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवस घरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा नातेवाईकांनी शोध घेतला. यावेळी श्री. दासु यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तरंगताना त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर नातेवाईकांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात माहिती दिली. लगेच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. बालाजी दिगांबर बागल यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. चक्रधर करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT