beed beed
मराठवाडा

Beed Crime: बीडमध्ये विवाहितेचा छळ करून मारहाण

अंभोरा पोलिस ठाण्याने सदर गुन्ह्याचा तपास करून आष्टी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

सकाळ वृत्तसेवा

अंभोरा पोलिस ठाण्याने सदर गुन्ह्याचा तपास करून आष्टी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

आष्टी (बीड): विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी सात आरोपींना दीड वर्षांची शिक्षा व प्रत्येकी दीड हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन. शिंपी यांनी ठोठावली आहे. तालुक्यातील पिंप्री आष्टी येथील विवाहितेने छळ व मारहाण प्रकरणी आष्टी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने सदरची तक्रार अंभोरा पोलिस ठाण्याला तपासकामी पाठविली. यानंतर अंभोरा पोलिस ठाण्याने सदर गुन्ह्याचा तपास करून आष्टी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचे साक्षीपुरावे व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत धामणगाव येथील सात आरोपींना कलम ४९८/अ प्रमाणे एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीस दिवसांचा साधा कारावास, तसेच कलम ३२३ प्रमाणे सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदर महिलेचा विवाह धामणगाव येथील युवकाशी झाला होता. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील चंद्रकांत जावळे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार एस.बी. निंबाळकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT