file photo  
मराठवाडा

झेडपीच्या विषय समित्यांचे कारभारी आज ठरणार 

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी नंंतर आज सोमवारी (ता.तीन) विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवड प्रक्रिया होत आहे. संख्याबळानुसार अध्यक्षपद राखून ठेवलेल्या काँग्रेसकडून तीन विषय समित्यांवर दावा करण्यात येत आहे. उपाध्यक्षपद मिळाल्याने शिवसनेलाही मिळेल त्यात समाधान मानावे लागणार असले तरी सत्तेच्या बेरजेत हातचा गमावणाऱ्या राष्ट्रवादीत मात्र, असंतोष आहे. 

राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सुत्र अवलंबून काँग्रेसने जिल्हा परिषदेत घटकपक्षांची मोट बांधली. संख्याबळावर अध्यक्षपद राखून ठेवत जिल्हापरिषदेवर काँग्रेसने वर्चस्व राखले. उपाध्यक्षपदासाठी संख्याबळाच्या गोळाबेरजेत शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीने हातचा गमवल्याने उपाध्यक्षपद शिवसेनच्या वाट्याला गेले. ऐनवेळी संख्याबळाचा आकडा घटल्याने राष्ट्रवादीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत हातचा गमवावा लागला. दरम्यान, उपाध्यक्षपदासह दोन समित्यांचा कारभार हाकणाऱ्या राष्ट्रवादीला आता कोणते पद मिळणार याची उत्सुकता आहे.

काँग्रेसचा तीन खात्यावर दावा -
शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळाल्याने अपेक्षेनुसार मिळणाऱ्या खात्यावर समाधानी रहावे लागणार असल्याचे बोलले जात आहेत. तर, दूसरीकडे काँग्रेसकच्या गोटातून मलाईदार तीन खात्यांची मागणी होत आहे. मागील आडीच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसकडे अध्यक्षपदासह शिक्षण व आरोग्य, समाजकल्याण खाते तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपदासह कृषी व पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण खाते होते. आगामी काळातील आडीच वर्षाच्या सत्तेसाठी महाविकास आघाडीच्या फार्म्यूल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला आले. 

दावेदारांमध्ये चुरस -  
सभापती निवड प्रक्रियेसाठी काँग्रेसकडून देगलूर- बिलोली, नांदेड दक्षीण, भोकर-आर्धापुर- मुदखेड या तीन विधानसभा मतदार संघाची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार मनोहर पाटील शिंदे, संजय बेळगे, ॲड. रामराव नाईक, बाळसाहेब रावणगांवकर, गंगाप्रसाद काकडे, अरुणा कल्याणे यांच्यात चुरस आहे.  खाते निश्चित नसल्यामुळे ऐनवेळी दावेदार ठरवण्यात येणार असला राष्ट्रवादीला पूर्वीच्या दोनपैकीच एक खाते मिळण्याचा अंदाज जानकारातून व्यक्त होत आहे. 

शिवसेनचा सावध पावित्रा
उपाध्यक्षपदावर वर्णी लागल्याने खाते वाटपात शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वीप्रमाणे बांधकाम व अर्थ खाते राखून ठेवण्याचे शिवसेनेकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पण काँग्रसेने दावा केल्यामुळे सावध पावित्र्यातील शिवसेना राष्ट्रवादीच्या भुमिकडे लक्ष ठेवून आहे. 

येथे क्लिक करा - राज्यातील पहिल्या उर्दू घराचे उद्‍घाटन कधी होणार?
 
राष्ट्रवादीच्या गोटात असंतोष
उपाध्यक्षपद हातचे गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटात असंतोषाचे वातावरण आहे. बापुसाहेब गोरठेकर गट सत्तेपासून दूर लोटताना माजी आमदार प्रदिप नाईक गटाची दमछाक होत आहे. त्यातच खाते कीती आणि कोणते मिळणार यावर सस्पेंन्स वाढल्याने राष्ट्रवादीच्या गोटात स्तब्धता आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT