फोटो 
मराठवाडा

शेरुसिंघ उर्फ शेरा प्रकरणाची सुनावणी २१ जानेवारी 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्‍हादंडाधिकारी यांच्‍या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण हे गोळीबारात मयत शेरुसिंघ उर्फ शेरा दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी (नांदेड) याच्‍या मृत्‍युची दंडाधिकारीय चौकशी सुरू करीत आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती व त्‍यांचे सहकारी पोलिस कर्मचारी तानाजी येळगे (बनं.१६०१) मोतीराम पवार (बनं.३१६०) शेख कलीम (बन.३०८१) यांनी ता. चार नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पोलीस ठाणे भाग्‍यनगरमध्ये दाखल झालेल्या गुन्‍ह्यातील पाहिजे असलेला आरोपी शेरूसिंघ उर्फ शेरा दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी, नांदेड याचा शोध घेत होते. अर्धापूर तालुक्यातील येळेगाव शिवारात अमरसिंघ चुंगीवाले यांचे शेतातील आखाड्यात उभ्‍या असलेल्‍या एका पांढ-या रंगाच्‍या टाटा सफारी गाडीतुन पोलीसांना पाहुन गाडीतुन उतरुन त्‍याने देशी बनावटीची पिस्‍टल हातात घेऊन पोलिस कर्मचारी तानाजी येळगेच्‍या दिशेने पिस्‍टलने एक गोळी फायर केली. त्‍याच क्षणी दुसरी गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचेवर फायर करीत असतानाच त्‍यांनी स्‍वतः चे आत्‍मसंरक्षणार्थ व तानजी येळगे यांचा प्राण वाचविण्‍यासाठी केलेल्‍या गोळीबारात शेरुसिंघ उर्फ शेरा खैरा हा जखमी झाला होता. 

रुग्णालयाने केले मृत घोषीत 

जखमी आरोपीचे प्राण वाचविण्‍यासाठी त्‍यास तात्‍काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. शासकीय रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शेरुसिंघ उर्फ शेरा खैरा यास तपासुन तो मरण पावल्‍याचे घोषीत केले. शेराच्या मृत्‍युचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्‍के यांचेकडे सोपविण्‍यात आला आहे.

एसडीओकडून चौकशी सुरू

प्रकरणात जिल्‍हाधिकारी यांचे आदेश क्र. २०१९/आरबी- १-डेस्‍क- २-टे-(४) दंडाधिकारी चौकशी-प्र.क्र.५४ ता. २१ नोव्‍हेंबर २०१९ अन्‍वये अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेरुसिंघ उर्फ शेरा  खैरा रा. माळटेकडी नांदेड यांच्‍या मृत्‍युच्‍या घटनेची दंडाधिकारीय चौकशी करणेसाठी उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांना आदेशीत केले आहे.

साक्ष पुरावे सादर करावेत

ज्‍या कोणास वर नमुद केलेल्‍या प्रकरणाशी संबंधी काही सांगावयाचे असल्‍यास किंवा साक्ष पुरावे नोंदवावयाचे असल्‍यास त्‍यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचे कार्यालयात त्‍यांचे समक्ष ता. २१ जानेवारी २०२० रोजी दुपारी चार वाजता आपले म्‍हणने मांडावे व साक्ष पुरावे सादर करावेत. असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. पठाण यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT