Solapur temperature rises to 43
Solapur temperature rises to 43 
मराठवाडा

Heat wave : मराठवाड्यात उष्णतेची लाट! परभणी ४४.७, नांदेड ४३.२, बीड ४३.० अंश सेल्सिअसवर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनंगर - सलग तिसऱ्या दिवशीही शनिवारी (ता.१३) मराठवाड्यातील तापमान वाढले. परभणी शहरात तर ४४.७ अंशावर सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ नांदेड ४३.२ तर बीड शहराचे ४३.० अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. इतरही प्रमुख शहरांत उष्णतेच्या लाटे सारखी स्थिती होती.

भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, परभणी शहराच्या तापमानात आता वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान वाढत आहे. बुधवारपासून (ता.१०) परभणीच्या तापमानात वाढ होत आहे. बुधवारी शहराचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यात वाढ झाली. गुरुवारी (ता. ११) शहराचे तापमान ४२.६ अंश अंशावर गेले.

शुक्रवारी (ता. १२) तापमान ४३.६ अंश इतके होते तर शनिवारी पारा अजूनच वाढला. तो ४४.७ अंश सेल्सिअसवर पोचला. परभणीचे किमान तापमानही २६.६ अंश सेल्सिअस होते. तापमान अजून काही दिवस वाढतेच राहणार असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.

हीटवेव म्हणजे का?

भारतीय हवामान विभागानुसार, मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त, समुद्रकिनाऱ्यावरच्या ठिकाणी ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त होते. तापमानात सरासरी तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा (हिटवेव) निर्माण होतात. सध्या मराठवाड्यातील धाराशिव वगळता इतर प्रमुख शहरांतील तापमानात ४.५ ते ६.४ अंशाने वाढ झालेली आहे. तापमानाने ४६ अंश सेल्सिअस ही मर्यादा ओलांडली, की उष्णतेची अतितीव्र लाट निर्माण झाली, असे म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT