बीड - धानोर परिसरा मांजरा पट्ट्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. नदीच्या परिसरात दोन किलोमीटर पाणीच पाणी झाले आहे. Beed Rain
मराठवाडा

Beed Rain : बीडच्या धानोरात पावसाचा हाहाकार, परिसरात पाणीच पाणी

अशोक कोळी

धानोरा (जि.बीड) : अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील मांजरा पट्ट्यातील गावात पावसाचा हाहाकार झाला. मांजरा धरणाचे सर्व दरवाजातून पाणी सोडल्याने तटबोरगाव मांजरा नदीच्या पात्रापासून दोन किलोमीटर रूंदीचे पात्र झाले आहे. दोन किलोमीटरपर्यंत पाणी वाहत पिके पाण्याखाली गेली आहेत. आपेगावमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. प्रशासनातील तहसिलदा (Rain In Beed) रात्रभर सरपंच यांच्या संपर्कात होते. ते नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत होते. तटबोरगाव नदी जागलीवर काही शेतकरी अडकले होते. सकाळी ते गावात सुखरूप आले. आपेगाव येथील झोपडपट्टीतील काही घरात प्राथमिक आरोग्य केंद्रात 33 केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले आहे.

काही शेतकऱ्यांनी शेतातील जनावरे सकाळी गावात आणली आहेत. पाण्यामुळे शिवारात काही जनावरे अडकली आहेत. नदी, नाले-ओढे यांना पुर आल्याने धानोरा खुर्द, आपेगाव, कोपरा, अंजनपूर, तटबोरगाव यांचा संपर्क तुटला आहे. अंबाजोगाई मुरूड रस्त्यावरील देवळा येथील मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. हा रस्ता बंद आहे. होळणा नदीला पूर आल्याने देवळा-अंजनपूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत सोमनाथ बोरगाव येथील पुलावरून पाणी वाहत या परिसरातील वाहतूक बंद पडली आहे. शेतीचे आतोनात नुकसान झाले सर्व शेती जलमय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT