कळंब (जि.उस्मानाबाद) - कळंब-ढोकी मार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प 
मराठवाडा

Osmanabad Rain : कळंब तालुक्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन पाण्यात

दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब (Kalamb) तालुक्यात गुरुवार (ता.२३) रात्री साडेआठच्या सुमारास सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. कळंब-ढोकी मार्गावर भाटशिरपुरा गावाजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असला तरी कळंब तालुक्यात पावसाचा 'बॅकलॉग' भरून निघालेला नव्हता. मात्र सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने (Rain In Osmanabad) तो भरून निघाला आहे. २० ते २४ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात पावसाचा धुमाकूळ असेल असे हवामान विभागाने अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी अलर्ट मोडवर होते. मागच्या तीन-चार दिवसांपूर्वी कळंब तालुका वगळता अन्य ठिकाणी पावसाने जोरदार मुसंडी मारली. तालुक्यात तुरळक ठिकाणी अत्यल्प पाऊस झाल्याची नोंद आहे. सोमवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सद्यःस्थितीत सर्वत्र सोयाबीन काढणी भरडणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. पावसाच्या अंदाजमुळे सोयाबीन काढणीचे काम शेतकऱ्यानी (Farmer) थांबविले आहे.

गुडघाभर पाण्यात सोयाबीन गेलं

कळंब तालुक्यात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बहुतांश शेतकऱ्याचे पीक उभे आहे. पावसामुळे पिके पाण्यात गेल्याने पाणी आटून जाईपर्यत पिके पाण्यात राहणार असल्याने प्रचंड असे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यातील इटकुर, गोविंदूर, मोहा, येरमळा, कळंब, शिराढोन महसूल मंडळात पावसाने जोरदार मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. नदी काटच्या जमिनीमधील पिके गुडघाभर पाण्यात गेली आहेत.

कळंब-ढोकी मार्गावरील वाहतूक ठप्प

कळंब-ढोकी मार्गाचे डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भाटशिरपुरा येथील पुलाचे काम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. मंगरूळ, खामसवाडी, गोविंदपूर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला असून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कळंबला येणारी वाहतूक मंगरूळ, पिंपळगाव (डोळा) मार्गे वळविण्यात आली होती. या मार्गावरील पुलावरील पाणी ओसरल्यावरच कळंब ढोकी मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT