rain-o.jpg
rain-o.jpg 
मराठवाडा

जालना : तीन मंडळात अतिवृष्टी

उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यातील तीन मंडळात  बुधवारी (ता.18) अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात  पारध मंडळात 147, वडीगोद्री मंडळात 124 मिलि तर अनवा मंडळात 70 मिलि मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात गुरूवारी (ता.19) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 19.06 मिलि मीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

यंदा ही आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने सरासरी  गाठली नाही. (ता.1 जून) ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 576.70 मिलिमीटर पाऊस पडने आपेक्षित आहे. मात्र आता पर्यंत केवल 434.84 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र परतीच्या पावसावर अवलंबून आहे. त्यात गुरूवारी (ता.19) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये  भोकरदन तालुक्यातील पारध मंडळात 147 मिलिमीटर, अनवा मंडळात 70 मिलिमीटर तर अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात 124 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेनुकाई मंडळात 66 मिलिमीटर, हसनाबाद मंडळात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, जालना तालुक्यातील वाघ्रुळ जहागीर, बदनापुर तालुक्यातील कुंभारझरी, परतुर तालुक्यातील परतुर, सातोना, श्रीष्टी मंठा तालुक्यातील मंठा, ढोकसाल, तळणी, पांगरी गोसावी या मंडळाकडे मात्र बुधवारी पावसाने पाठ फिरवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT