टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) ः रविवारी दुपारी दमदार पाऊस झाला.  
मराठवाडा

वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस, टाकळी -अब्दुलपूर प्रकल्प भरला

आरेफ पटेल

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) ः रविवारी (ता. सहा) टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथे दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावले असून बाजरीची काढणी करणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.
यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे यंदाही दुष्काळाची चिन्हे गडद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती; परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसात टाकळी-दासावाडी रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. यातील काही झाडे शेतकऱ्यांनी स्वतः छाटणी करून बाजूला करीत रस्ता मोकळा केला. पोळ्यानंतर परिसरात काही प्रमाणात चांगला पाऊस झाला. दक्षिण बाजूने वाहणारी गिरिजा नदी आणि उत्तरेकडून वाहणारी सुरजा नदीही आता वाहती झाल्यामुळे नदीशेजारील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या अल्प पावसामुळे कोरडा पडलेला टाकळी अब्दुलपूर लघुसिंचन प्रकल्प धरण यंदा शंभर टक्के भरला आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे या भागात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या धरणापासून टाकळी व अब्दुलपूर धरणाची तहान भागवली जाते; परंतु यंदा उशिरा का होईना पण परतीच्या पावसाने मोठी आशा निर्माण केली असून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli election: अर्ज माघारीनंतर शिराळा राजकारणात भूचाल! ‘निष्ठा विरुद्ध संधी’ संघर्षामुळे पक्षांतराची मोठी लाट उसळली

घरी लग्नकार्य, ४ दिवसांनी अंत्यसंस्कार करायचे; वृद्धाश्रमात निधन झालेल्या आईचा मृतदेह थोरल्या लेकानं पुरून ठेवला

IND vs SA, 2nd Test: मार्करमचा सुपरमॅनसारखा सूर मारत हवेतच एकाहाती कॅच; जडेजा-नितीश रेड्डी पाहातच राहिले; पाहा Video

Navale Bridge Pune: भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजपर्यंत वेग मर्यादा निश्चित; पुणे वाहतूक पोलिसांचा नवा नियम नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतमजुराने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT