file photo 
मराठवाडा

हिंगोली : कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  कृषि विभागाचे आवाहन 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील हंगामात कापुस पिकावर होणारा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फरदड खोडवा घेण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाने केले आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी कापुस पिकांची डिसेंबर महीन्यानंतर फरदड खोडवा घेणे टाळावे जेणेकरुन अळीचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. डिसेंबर - जानेवारी महिन्यापुर्वी कापुस पिकाची शेतातुन काढणी पुर्ण करावी तसेच शेवटच्या वेचणीनंतर पीक काढणीपुर्वी शेतात शेळया मेंढ्या चाराण्यास सोडाव्यात. जेणेकरुन रोगग्रस्त प्रादुर्भावित बोंडे नष्ट होतील आणि पुढील हंगामात प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल . 

जिल्हातील कापुस जिनिग मिल्स व मार्केट यार्ड भोवती कामगंध सापळे व प्रकाश सापळे लावण्यात यावेत जेणेकरुन सामुहिकरित्या नर पतंग पकडून नष्ट करता येतील व पुढील हंगामात प्रादुर्भाव कमी होईल, शेतातील पर्हाट्या व रोगग्रस्त कापुस पिकांचे अवशेष नष्ट करावेत. उन्हाळयात  कापुस पिकाच्या शेताची खोल नांगरट करावी जेणेकरुन किडीच्या अवस्था संपण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांची कापसाची पुर्वहंगामी लागवड करणे टाळावे. 

बीटी कापसाभोवती नॉनबीटी रेफयुजी कापुस बियाणाची लागवड करावी . शेवटच्या वेचणीनंतर शेतातील पर्हाट्या  रोटावेटर यासारख्या यंत्राद्वारे लहान लहान तुकडे करून शेतात गाडावेत किंवा त्याचा वापर शेताबाहेर कंपोस्टखत तयार करण्यासाठी करावा . तसेच शेतकऱ्यांनी पिक फेर पालट करावी . सतत एकाच शेतात पुन्हा पुन्हा कापुस पिक घेणे टाळावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची एकाचवेळी लागवड करावी . जिल्हयातील सर्व कापुस उत्पादक शेतकरी तसेच कापुस जिनिग मिल्स चालक यांनी पुढील हंगामात होणारा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सुचना उपाय योजनांचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी   व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे .

संपादन -  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT