हिंगोली : मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या (एप्रिल- जानेवारी- २०२१) या कालावधीत सशहरातील ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, गृहनिर्माण संस्था, मार्केट यांच्यामध्ये स्वच्छ रँकिंग स्वर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्वच्छ कार्यालयात सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने बाजी मारली.
ही स्पर्धा शहरातील ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, गृहनिर्माण संस्था, मार्केट यांच्याकडून स्वयं मुल्यांकन फॉर्म प्रत्येक महिन्याकरीता एप्रिल ते जानेवारी २०२१ या कालवधी भरून घेण्यात आली. त्यानुसार सर्वांचे स्वयं मुल्यांकन फॉर्मच्या आधारे आणि प्रत्यक्ष पाहनीकरून त्यांचे गुणांकन नगर परिषद हिंगोली स्वच्छ सर्वेक्षण २०२१ यासमितीकडून करण्यात आले व या स्पर्ध्येचा निकाल जाहीर करण्यात आला.
हेही वाचा - Success Story : सवना येथे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी उपक्रम
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधील स्वच्छ रँकिंग स्पर्ध्येचा निकाल गुरुवारी( ता. ११ ) समितीकडून लावण्यात आला. प्रत्येक गटामध्ये प्रथम रँक असा निकाल काढण्यात आला. प्रथम रँकमध्ये सहायक आयुक्त समाजकल्याण ऑफिस, सर्वात स्वच्छ ऑफिस, तर सर्वात स्वच्छ शाळा सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल शास्त्री नगर, सर्वात स्वच्छ हॉटेल श्रीनिवास हॉटेल अकोला रोड, सर्वात स्वच्छ गृहनिर्माण संस्था आदर्श गृहनिर्माण संस्था यशवंत नगर, स्वच्छ मार्केट भाजी मार्केट जवहार रोड, आणि सर्वात स्वच्छ हॉस्पिटल भगत हॉस्पिटल देवडानगर या सर्वाना प्रथम स्वच्छ रँक मिळाली आहे.
सर्व विजेत्यांचा हिंगोली नगर परिषदकडून स्वागत करण्यात आले. सर्व विजेत्यांचे हिंगोली नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाना स्वच्छ रँकिंगचे प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे व पुढील सर्वेक्षणाकरीता स्पर्धेची तयारी करून सक्रीय सहभाग नोंदवावा तसेच हिंगोली शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी जागृत जिम्मेदार नागरिकाची भूमिका बजावावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.