aundha Nagnath Mahashivratri Yatra sakal
मराठवाडा

Hingoli : महाशिवरात्री यात्रेची औंढ्यात तयारी

नागनाथ मंदिर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी होणार

राजेश नागरे

औंढा नागनाथ : येथील प्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ यांच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सव ता. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिर परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटी बाबत संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुडे यांनी मंदिर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.

यात्रेनिमित्त मुख्य मंदिराची रंगरंगोटी व परिसर स्वच्छता केली जाणार आहे. शिवाय येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. कानगुले यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, मंदिरामध्ये रांगेतील भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिराच्या लगत असलेल्या रांगेत सावलीची सुविधा करण्यात आली.

दर्शन व्यवस्थेची बॅरिकेटिंग लाइटिंग, पंखा, रांगेतील भाविकाला पिण्याचे पाणी, व्यवस्था व येणाऱ्या भाविकांना जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी संस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, कृष्णा पाटील, बबन सोनुने, नागेश माने, जगदेव दिंडे, गणेश जगताप, नामदेव पाटील, भगवान शिंदे, मुकेश पडोळे, मंचक सोळंके, सुरेश मोरे, सुरेखा शिंदे, शोभा जोशी यांच्यासह संस्थानच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

रथाची दुरुस्ती

ता. २१ फेब्रुवारीला रथोत्सव होणार आहे. मध्ये ठेवलेला रथ रथसप्तमीच्या दिवशी बाहेर काढण्यात आला. त्याची रंग रंगोटी, किरकोळ दुरुस्ती केली जात आहे. महाशिरात्रीनिमित्त रथोत्सव हा मोठा असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. तंत्रनिकेतन अधिकाऱ्यांना या रथाची पाहणी व दुरुस्तीसाठी पत्रदेखील देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT