Hingoli News sakal
मराठवाडा

Hingoli News: वासुदेवाची स्वारी झाली दुर्मिळ

उपजीविकेसाठी वासुदेव समाजातील व्यक्तींनी पत्करला दुसरा मार्ग

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : शहरासह ग्रामीण भागात वासुदेवाची स्वारी अगदी नित्य नेमाने असायची. वासुदेव सकाळी-सकाळी गावात भेट देऊन धार्मिक गाणे गात, पुराणकथा सांगत. त्यातून धार्मिक गोष्टी कानावर पडत. शिवाय मनोरंजनही होत होते.

पण, मागील काही वर्षांपासून मनोरंजनाची साधने वाढली त्यामुळे वासुदेवाची स्वारी आता दुर्मिळ झाली आहे. वासुदेव समाजातील नव्या पिढीने आता उपजीविकेसाठी अन्य मार्ग स्वीकारला.

बदलत्या काळानुसार डिजिटल युगात आता वासुदेव काळाच्या पडद्याआड गेला आहे.

डोक्यावर मोरपिसांची निमुळती टोपी, गळ्यात कवड्यांच्या माळा, घोळदार अंगरखा, धोतर, कमरेला शेला, त्यात रोवलेली बासरी, हातात पितळाची टाळ-चिपळ्या, मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरुवात करीत धर्म भावना जागरूक करीत गावोगावी वासुदेवाची होणारी स्वारी दिसेनाशी झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पूर्वी वासुदेवाला गावात मान दिला जात होता.

लोक धार्मिक आणि श्रद्धाळू बाणा जपून होते. वासुदेव येताच नागरिक आपल्या हातातील काम सोडून थोडा वेळ थांबून दाद द्यायचे.

शिवाय घरातील लक्ष्मी दान देताना कधी हात आखडता घेत नसे. ग्रामीण भागात तांबडं फुटायच्या आत ‘वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला’ हे शब्द कानी पडतं. अंगणात वासुदेव येताच महिला त्याच्या झोळीत पसाभर दान टाकायच्या.

करायचे कुळाचा उद्धार

वासुदेव जुन्या पिढीचा उद्धार करायचे. मग लहान मोठ्यांचे कौतुक वासुदेवाच्या तोंडून व्हायचे. याचे क्षणभर कौतुकही वाटायचे आणि मोठ्या मनाने त्यांना रोख स्वरूपात दान दिले जायचे.

गावात वासुदेव आल्यावर त्याला पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी व्हायची. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे.

आता उरले केवळ फोटोपुरते

पूर्वी पहाटेला जात्याच्या घरघरीतून ओव्या प्रकटायच्या त्याचवेळी ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, असे गाणे गात अंगणात वासुदेव आलेला असायचा.

वासुदेव आपल्या अंगणात आला की, प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटीस आलाय असे वाटायचे. आता मात्र गावागावांत दिसणारे वासुदेव दुर्मिळ झाले आहेत. भविष्यात फोटोत, इंटरनेटवर, चित्रपटांत अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांतच वासुदेव पाहावे लागतील यात तिळमात्र शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT