The Hingoli Chamber of Commerce has called for a district shutdown 
मराठवाडा

हिंगोली व्यापारी संघाकडून जिल्हा बंदचे आवाहन; वसमत व्यापारी महासंघाचा ही बंदला पाठींबा

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शासनाकडून जीएसटीमध्ये होणारे बदल व कायदयाचा विरोध बाबत शुक्रवारी (ता. २६) जिल्हा बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला वसमत येथील व्यापारी महासंघानेही पाठींबा दिला आहे. त्या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक मंगळवारी जिल्हा व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी तर वसमत येथे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती मंदिर झेंडा चौक येथे बैठक पार पडली.

या वेळी जीएसटी संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जीएसटीमध्ये होणारे बदल व कायदे याबद्दल जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. शुक्रवारी आयोजित भारत बंदला पाठींबा देत हिंगोली जिल्हा बंदचे आवाहन व्यापारी संघाच्या मार्फत करण्यात आले.

या वेळी हिंगोली येथील बैठकीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे, प्रकाशशेठ सोनी, सुभाषशेठ लदनिया, पंकज अग्रवाल, सुनीलजी मानका दिपकजी नेमोदीया, सुदर्शनजी कंदि, मनिषजी राठोड, भोलाशेठ कालावडिया, मुरली हेडा, राजेश अग्रवाल, कचरूशेठ अग्रवाल, रितेश अग्रवाल, नोमन शेख, नागेश धनमने, नितीन बजाज, कृष्णा ढोके, गोपाल बासटवार, गिरीश बासटवार, राधावल्लभ काबरा, अमित चांडक तर वसमत येथील बैठकीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, कापड असोशियनचे अध्यक्ष अशोक पवार, महादेव कापुसकरी, किराणा व भुसार असोसिएशनचे अध्यक्ष नवीन कुमार चौकडा, सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुल्थे, कापड असोशनचे भारत नामपल्ली, महेश दलाल, आडत व्यापारी लक्ष्मीनारायण मुरक्या, जनरल मर्चंट असोशियनचे अध्यक्ष संजय पवार, इलेक्ट्रिकल असोसिएशनचे राजू कडतंन, व्यापारी महासंघाचे सचिव राजू लालपोतू, सहसचिव मनमथ अप्पा बेले, वसमत तालुका मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष फेरोज पठाण, आडत व्यापारी असोसिएशनचे अलोक जाधव, फर्टिलायझर्स असोसिएशनचे सुभाष कदम, मशनरी असोसिएशनचे भारत स्वामी, किराणा व्यापारी एस.के. पाशा, कर सल्लागार शुभम लोहिया, दीपक कट्टेकर, राजू चौकडा आदिंची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT