Chief Minister Eknath Shinde,Santosh Bangar sakal
मराठवाडा

Hingoli :‘कयाधू’वर बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक ; आ. संतोष बांगर

आमदार बांगर, माजी खासदार माने यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा

राजेश नागरे

हिंगोली : जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर नियोजित सात उच्च पातळी बंधारे बांधण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने यांच्यात शुक्रवारी (ता. २१) सकारात्मक चर्चा झाली. नियम व अटी शिथिल करून बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सिंचन विभागातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्या सोबत आमदार संतोष बांगर व माजी खा. शिवाजी माने यांची हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या मद्यावर मुंबईत बैठक घेण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या मुद्यांवर माजी खासदार माने हे गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत होते. त्यांच्या या लढ्याला आमदार बांगर यांनी साथ दिली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना आ. संतोष बांगर, ॲड. शिवाजी माने, राम कदम, सुभाष बांगर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नियम अटी शर्ती बाजूला ठेवून लवकरात- लवकर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवर ७ उच्च पातळी बंधारे झाले पाहिजेत, तसेच याबाबतीत कसल्याही प्रकारची हयगय होता कामा नये,

अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले. यामुळे कयाधू नदीवर उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे आ. बांगर म्हणाले. तसेच ईसापूर धरणाची दोन मीटर उंची वाढवून सापळी धरण रद्द करण्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा करण्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT