MLA Santosh Bangar sakal
मराठवाडा

Hingoli : कापूस आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली

आंदोलनात गोळीबार केल्याने वीरमरण पत्करलेल्या तीन शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकले नाहीत

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : कापूस आंदोलनामधील गोळीबारामध्ये १९८६ साली वीरमरण पत्करलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव (ता. औंढा नागनाथ) येथे शनिवारी (ता. दहा) सकाळी आदरांजली वाहण्यात आली. तत्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी, म्हणून आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना वीरमरण आले होते. गोळीबारात सुरवाडी येथील ज्ञानदेव टोम्पे, डिग्रस येथील परसराम कऱ्हाळे, निवृत्ती कऱ्हाळे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता.

तर, आंदोलनात सहभागी ५५ शेतकऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. शंभरपेक्षा अधिक शेतकरी गोळी लागल्याने जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शेतमालाला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. परंतु, आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. तेव्हा आणि आजही शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी दर मिळवण्यासाठी झगडावेच लागत आहे. सुरेगावचे १९८६ मधील हे आंदोलन अंगावर शहारे आणणारे आहे.

आंदोलनात गोळीबार केल्याने वीरमरण पत्करलेल्या तीन शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकले नाहीत. या वीरमरण आलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे शनिवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार संतोष बांगर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ब. ल. तामस्कर, उत्तमराव वाबळे, ॲड. प्रदीप पोले, साहेबराव देशमुख, माधव पोले, गुलाब पाटील, सर्जेराव दिंडे, बाळासाहेब पोले, खंडबाराव नाईक, आप्पाराव सोळंके, कानबाराव तात्या पोले, गजानन पारडे, बाबूराव नाईक, शुभम पोले, गणेश कऱ्हाळे, संभाराव सुरुशे, प्रभाकर पोले, देविदास दिंडे, कानबाराव पोले, चंपतराव पोले,

शंकर यादव, प्रभाकर पोले, बाळू महाराज, सखाराम पोले, मसाराव पोले, राधाकिसन मस्के, नागेश पोले, गुलाबराव पाटील, विजय मस्के, भागोराव पोले, बाळासाहेब चेअरमन पोले, विजय पोले, भाऊराव दिंडे, रामप्रसाद पोले, प्रज्योल पोले, गजानन पोले, उमेश पोले, शंकर सुरोशे, विकास पोले, भुजंग पोले, चंद्रकांत पोले, शिवाजी टोम्पे, राजू पाटील, लखन शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, ज्ञानेश्वर गोरे, राजकुमार कुटे, वशीम पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

Beed: कार्डियक रुग्णवाहिका पोहचली थेट पोलीस ठाण्यात; डॉक्टरची मोठी चूक? अपघातातल्या रुग्णाचा मृत्यू

Sakal Book Festival : खरा आनंद पुस्तक वाचनातूनच, मान्यवरांचे मत; सकाळ पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Students Overdose Incident : गोळ्यांचा ओव्हरडोज; शिक्षक, मुख्याध्यापक निलंबित; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Mumbai: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला जोरदार धक्का; मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT