Hingoli vaccine sakal media
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात २३ टक्के नागरिक लसीविना

शंभर टक्के लसीकरणासाठी घरोघरी भेटी देण्याचे सीईओंचे आदेश

राजेश नागरे

हिंगोली : जिल्ह्यात कोविडचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ८.८४ लाख आहे. त्यांची टक्केवारी ७७ टक्के आहे. अजून २३ टक्के नागरिक पहिल्या डोसपासून वंचित आहेत. आता १०० टक्के लसीकरणासाठी घरोघरी भेटी देऊन पहिला, दुसरा व बूस्टर डोस घेण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. शंभर टक्के लसीकरण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी संबंधितांना सोमवारी (ता. २७) दिले आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी लसीकरण हा पर्याय असून, नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या वतीने ‘हर घर दस्तक’ योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व २४ प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाचे पथक जनजागृती करीत आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ, अनंतकुमार कुंभार, आत्माराम बोंद्रे, विशाल राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या पथकाकडून प्रत्येक गावात लसीकरण न झालेल्या गावकऱ्यांची माहिती घेऊन त्यांची यादी तयार करावी; तसेच यादीनुसार लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही दैने यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना श्री. दैने यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये; तसेच घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा. बाहेरून घरी आल्यानंतर वारंवार साबणाने हात धुवावेत. ज्या नागरिकांना सर्दी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यावर त्यांनी कोविड तपासणी करून घ्यावी, जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या ८.८४ लाख आहे. ७७ टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या ७.२७ लाख आहे. ६६ टक्के तर १२ हजार लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT