hingoli sakal
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी

कयाधू, आसना नदीला पूर; चोवीस तासांत ६६.७० मिलिमीटर पाऊस

राजेश नागरे

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी (ता.नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत ६६.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर, कयाधू, आसना, जलेश्वर या नद्यांना पूर आला आहे. यात पिकांचे देखील नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुरुंदा मंडळात १७९.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुका ४७.९० मिलिमीटर, कळमनुरी ९६.९०, वसमत १०६.२, औंढा ४५.८० तर सेनगाव तालुक्यात २६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे हिंगोली मंडळात ५८.३, नर्सी नामदेव ६३, सिरसम २५.४,बासंबा २७.८, डिग्रस ५५, माळहिवरा ४०.५, खांबाळा ६५.३, कळमनुरी मंडळात ४१.८, मिलिमीटर, वाकोडी ६५, नांदापूर ३९, बाळापूर १२७.५, डोंगरकडा १५७.८, वारंगा १५०, वसमत मंडळात ८८.३, आंबा १३० ५, हयातनगर ६९.३, गिरगाव १६७.८, हट्टा ५२.३, टेंभुर्णी ५५ ८, कुरुंदा १७९.३ मिलिमीटर, औंढा मंडळात ४८.५, येहळेगाव ३३, साळणा ४८.५, जवळा ५३.५, सेनगाव मंडळात १७.८, गोरेगाव १९.८, आजेगाव ३३.५,, गोरेगाव ३८ ५, आजेगाव २४.३, साखरा १३.८, पानकनेरगाव १५.५, हत्ता ३३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT