महावितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. sakal
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात भारनियमनाची वेळ निश्चित करा

भारनियमानाचे आदेश आले असेल तर ते निश्चितच पाळावे

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: जिल्ह्यातील व शहरातील मनमानी पध्दतीने रात्री - बेरात्री विद्युत भारनियमन न करता त्याची वेळ निश्चित करण्याची मागणी गुरुवारी (ता.२१) महावितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत रवी बांगर, विलास आघाव, सागर काठोळे, प्रदिप वानरे, मोहन बांगर, विठ्ठल बांगर, उमेश कुटे, भोला चव्हाण आदींनी निवेदन दिले आहे. बऱ्याच दिवसांपासुन रात्री बेरात्री भारनियमनाच्या नावावर विद्युत प्रवाह मनमानी पध्दतीने बंद करण्यात येत आहे. यासाठी संबंधीत कार्यालयाला कारण विचारले असता वरिष्ठाकडून भारनियमानाचे आदेश आले आहेत.

असे सांगण्यात येते. परंतु भारनियमानाचे आदेश आले असेल तर ते निश्चितच पाळावे. वीज बचतच्या नावाखाली रात्री बेरात्री विद्युत प्रवाह बंद केल्यामुळे अंधार असल्यामुळे चोरीचे प्रमाण व गुन्हेगारीचे प्रमाण वाढु शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच वृध्द नागरीक व लहान मुले यांना उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरामध्ये त्रास होतो. त्यामुळे संबंधीत कार्यालयाने भारनियमनाची वेळ व दिवस निश्चित करावी. जेणे करुन सर्वसामान्य नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

रात्री बेरात्री विद्युत प्रवाह बंद केल्यास आम्ही हिंगोलीकर मुलाबाळांसह महावितरण कार्यालयात येऊन आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: डहाणू-विरार लोकल प्रवास आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर पहिली १५ डब्यांची ट्रेन सुरू; प्रवाशांना दिलासा

बाऊन्सरपेक्षा 'तिला' घाबरतो! भर कार्यक्रमात चेन्नईच्या कर्णधाराने दिली कबुली; पाहा व्हिडिओ...

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना ! ९ वर्षांच्या मुलीची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले

Konkan Hapus Festival : कोकण हापूसचा सुगंध दिल्लीत दरवळला! हजार डझन आंबा तीन तासांत संपला; आंब्याचा सध्या कसा आहे दर?

6 महिन्याची गर्भवती असताना अभिनेत्री जीममध्ये करतेय वर्कआऊट, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT