Hingoli News sakal
मराठवाडा

Hingoli News: भूकंपाची माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित करा ; नागरिकांची अपेक्षा

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत मागील काही वर्षांपासून अधून-मधून भूगर्भातून आवाज येतो. दरम्यान, या भागाला रविवारी (ता. आठ) भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे या भागात भूकंपाची पूर्व कल्पना देणारी यंत्रणा बसवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील ४० ते ५० गावांत १२ वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहेत. पूर्वी कधीतरी येणारा हा आवाज आता अनेकदा ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, दोन वर्षांत तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्केदेखील बसले आहेत. रविवारीही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे घरातील भांडी खाली पडल्याचे गावकरी सांगत आहेत. या सतत होणाऱ्या आवाजाने आता मात्र गावकरी भयभीत झाले आहेत.

त्यामुळे हा आवाज नेमका कसा येतो याचे संशोधन करून भूकंपाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा कार्यन्वित करावी, अशी मागणी होत आहे.

माझे गाव कळमनुरी तालुक्यातील सिंदगी आहे. भूगर्भातील आवाज व भूकंपाचे धक्के मी अनुभवले आहेत. सतत होणारे आवाज, बसणारे भूकंपाचे धक्के यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर भूकंपाची माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे झाले आहे.

बाळासाहेब मगर, जिल्हा संघटक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

भूगर्भातील होणारे आवाज तसेच भूकंप या बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन वेळोवेळी या गावांमध्ये जनजागृती करते.

अशा वेळी काय केले पाहिजे याची माहिती गावकऱ्यांना दिली जाते. तसेच संबंधित गावात महसूल प्रशासनातर्फे माहिती घेऊन ती वरिष्ठांपर्यंत पोचवली जाते.

रोहित कंजे, आपत्ती व्यवस्थापन विभाग

आमच्या गावात आतापर्यंत शंभरापेक्षा अधिक वेळा जमिनीतून आवाज आला आहे. तीन ते चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास कळविले आहे.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोन वेळा गावात येऊन या संदर्भात माहिती घेतली. मात्र, जिल्हास्तरावर भूकंपाची माहिती देणारी यंत्रणा असल्यास त्याचा गावकऱ्यांना लाभ होणार आहे.

भागवत शिंदे, माजी सरपंच, पांगरा शिंदे

आमचे अर्धेगाव गडीवर असल्यासारखे आहे. यामुळे भूगर्भातील आवाज आल्यावर उंच असलेल्या घरांना चांगलाच धक्का बसत आहे. यामुळे असे होणारे आवाज यासाठी पूर्व माहिती देणारी यंत्रणा असल्यास गावकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

पुरभाजी चेभेले, गावकरी, पोतरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

SCROLL FOR NEXT