Hingoli News sakal
मराठवाडा

Hingoli News: शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

विविध मागण्यांसाठी बळिराजा आक्रमक, पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शेतकऱ्यांच्या वतीने गोरेगाव येथे विविध मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गुरुवारी (ता.१९) भगवती येथील पैनगंगा नदीवर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी प्रशासनामार्फत मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान नामदेव पतंगे, अर्जुन नायक, दशरथ मुळे, वसुदेव जाधव, माधवराव देशमुख आदी शेतकऱ्यांची उपस्थित होती.

दरम्यान, जलसमाधी आंदोलनापासून परावृत्त होण्यासंदर्भात सेनगाव तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी संबंधित शेतकऱ्यांना पत्र दिले. त्यात नमूद केले आहे

की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी २०२० ते २०२१ चे विमा संरक्षित रक्कमेचे प्रलंबित दायित्व रक्कम १३.८९ कोटी मिळण्यासाठी तसेच २०२२ च्या खरीप हंगामातील काढणी पश्चात नुकसान या जोखीम अंतर्गत अनुज्ञेय दायित्व अदा करण्यासाठी राज्य शासन स्तरावर विमा कंपनीस केंद्र व राज्य हिस्याच्या प्रिमियमचा दुसरा हप्ता अदा करण्यासाठी जिल्हा सनियंत्रण समितीने शिफारस केली आहे. याबाबत पुढील कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात येत आहे.

शासन निर्णयाअन्वये शासनाने खरीप हंगाम २०२२ साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान कंपनीस दुसरा हप्ता वितरित करण्याबाबतचा आदेश दिलेला

आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT