Hockey Tournament sakal
मराठवाडा

हिंगोलीत दोनदिवसीय हॉकी क्रीडा स्पर्धा होणार

हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील.

राजेश नागरे

हिंगोली : राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा दोन सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी स्टेडिअम, नवी दिल्ली येथे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शालेय नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ता. ११ व १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

स्पर्धेची प्रवेशिका ता. आठ ऑगस्ट र्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता, ता. जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका दाखल करताना प्रवेशिकेसोबत खेळाडूंचे परिपूर्ण भरलेले ओळखपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला इत्यादी असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ वर्षे मुले (सब ज्युनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म ता. एक नोव्हेंबर २००७ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षे मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म ता. एक नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १५ वर्षे मुले (सब ज्युनिअर), १७ वर्षे मुले (ज्युनिअर) व १७ वर्षे मुली (ज्युनिअर) या तिन्ही गटांसाठी प्रती गट १६ याप्रमाणे खेळाडूंची संख्या आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडू व संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT