Hingoli Inflation on bail pola festival 
मराठवाडा

हिंगोली : यंदा पोळ्यावरही महागाईची ‘झूल’

बाजारात गर्दी, बाशिंगासह गोंड्यांच्या किमती वाढल्या

राजेश दारव्हेकर

हिंगोली : बैलपोळ्यांचा सण आठ दिवसांवर आला. त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग चालली आहे. साजाच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला असून, किमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, यंदा पोळा सणावरही महागाईची ‘झूल’ चढली असल्याचे चित्र आहे.

वर्षभर शेतात काम करून उत्पन्न देणारे बैल हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्यामुळे या दिवशी बैलांना शेतातील कामाला लावले जात नाही; तसेच या दिवशी बैलांना जूसुद्धा दाखविला जात नाही. त्यांच्या अंगावर साज घालून गावातील देवदेवतांचे दर्शन घेऊन बैलांना पोळ्याच्या ठिकाणी नेले जाते. मानांच्या बैलांना या दिवशी विशेष महत्त्व असते.

बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी बैलांचे लग्न लावण्याचीही परंपरा आहे. पूर्वी तागापासून विविध साजाच्या वस्तू तयार केल्या जात होत्या. मात्र, आता ताग मिळत नसल्याने सुतापासून या वस्तू तयार केल्या जात आहेत. पण, गतवर्षीच्या तुलनेत या वस्तू महाग झाल्या आहेत.

बाजारात बैलांच्या साजात कासरे, मोरक्या घुगंरमाळा, कवडीच्या माळा, गळ्यातील चामडीचे पट्टे, वेसण, सुताचे गोंडे, बाशिंगासह शिंगांना लावण्यासाठी रंग विक्रीस आले. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रत्येक वस्तूंची १५ ते २० टक्के भाव वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT