Hingoli News esakal
मराठवाडा

Hingoli News: हिंगोली-मुंबई रेल्वेसेवा लवकरच सुरू

रेल्वे राज्यमंत्री दानवेंचे आश्वासन, खासदार हेमंत पाटील यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली- मुंबई रेल्वेसेवा लवकरच सुरु केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून हिंगोली-मुंबई रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी करत आहेत. यासाठी अनेकवेळा रेल्वे रोको आंदोलने करण्यात आली आहेत. तसेच हिंगोली आणि वाशीम या दोन्ही जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जातो.

परंतु, महाराष्ट्राच्या राजधानीशी जोडणारी एकही रेल्वे अद्याप हिंगोली जिल्ह्यातून सुरु करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी रावसाहेब दानवे यांनी विशेष बैठक बोलावून हिंगोली-मुंबई रेल्वे सेवा सुरु करावी. अशी मागणी केली होती. यानुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी गुरुवारी दिल्ली येथील रेल्वेभवनात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. बैठकीस खासदार हेमंत पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रमुख कार्यकारी संचालक श्री. सिंघ (कोच) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Hingoli News)

यावेळी खासदार पाटील यांनी हिंगोली किंवा अकोला रेल्वे स्थानकाहून रेल्वे गाडी सायंकाळी निघून ती दुसऱ्या दिवसी सकाळी किमान नऊच्या सुमारास मुंबई येथे पोहचावी, अशी एक विशेष रेल्वे सुरु करावी, यासह हिंगोली येथे स्वतंत्र रेल्वे पिट लाईन तयार करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT