file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : साखरा शिवारात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून

विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील साखरातांडा शिवारात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी (ता. १०) सकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनाचा शोध सुरु आहे. 

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे मागच्या दोन दिवसापूर्वीच तलवारीने खून झाल्याची घटना घडली होती. आज पुन्हा तालुक्यातील साखरातांडा शिवारात एका ७५ वर्षीय वृध्द महिलेचा खून करुन तिचा मृतदेह एका नाल्यात पुरुन टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आजुबाजूच्या शेत शिवारातील शेतात राहणाऱ्या आवाज कानावर पडल्यानंतर या शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले तर एका वृद्ध महिलेचा खून करुन खूनी फरार झाले होते. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ सेनगाव पोलिसांना दिली. 

सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एका वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु केली. मयत महिलेचं नाव भारजाबाई मारोतराव इंगळे रा. साखरा ता. सेनगाव वय अंदाजे ७५ वर्ष आहे. त्यांना चार मुले आहेत. मात्र त्या एकट्या राहत असल्याची माहिती आहे. खून का व कशामुळे करण्यात आला. याची माहिती नाही. पोलिसांकडून शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी, ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधीक्षक शिवानंद वाखारे, सेनगावचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा तपास करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मागच्या तीन दिवसात सेनगाव तालुक्यातील ही खुनाची दूसरी घटना आहे. या घटनेतील आरोपी पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT