आंदोलन
आंदोलन  sakal
मराठवाडा

Hingoli : वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

राजेश नागरे

हिंगोली : वीजपुरवठा सुरळीत ठेवून वीजबिलाची सक्ती थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २९) नर्सी नामदेव बसस्थानक परिसरातील हिंगोली ते सेनगाव रोडवर शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले.

नर्सी येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून, येथून जवळपास २३ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगामास सुरुवात झाली असून, गहू, हरभरा, तूर, कापूस आदी पिकांना शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागत आहे. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. हा प्रकार महावितरणच्या गलथान कारभारामुळे होत असल्याने शेतकऱ्यांमधून रोष‌‌‌ व्यक्त होत आहे.

सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडू नये, शेतीसाठी दिवसा आठ तास वीज पुरवठा करणे, कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विद्युत पुरवठा जोडून देणे, शेतातील जळालेले रोहित्र ४८ तासांत बसून देणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन शेतकऱ्यांनी केले. आंदोलनामध्ये डॉ. रमेश शिंदे, भिकाजी कदम, भानुदास जाधव, बद्रीनाथ घोंगडे, शाहीन पठाण, श्यामराव कावळे, माधव गाडे, वैजनाथ डांगे, प्रभाकर कदम, सुशांत घोंगडे,

रामकिशन पातळे, नामदेव काकडे, नागेश गायकवाड, उत्तम नागरे, विनोद पाटील, उत्तम मुळे, आकाश मोरे, माणिक गाडे, कावरखे पाटील, किरण गायकवाड आदी सहभागी झाले होते. आंदोलन ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नर्सीचे सपोनि अरुण नागरे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT