मुंबई : त्रिभाषा धोरणाविरोधात लढा देणाऱ्या मराठी जनतेच्या विजयाच्या निमित्ताने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) संयुक्त विजयी मेळावा आज (5 जुलै) मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोघेही तब्बल 18 वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्र दिसणार असून, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता यामुळे वाढली आहे.