file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : रोहित्राला आग लागुन हरभरा पिकांचे नुकसान, सालेगाव येथील घटना

संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील सालेगाव येथील शेतात असलेल्या वीज रोहित्रा ला सोमवार (ता. एक) आग लागून शेतामध्ये काढून ठेवलेल्या हरभरा पीक व रोहित्र जळून जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सालेगाव येथील जगन्नाथ गुठे यांचे गावालगत शेत आहे. शेतामध्ये वीज वितरण कंपनीचे रोहित्र बसविण्यात आलेले आहे. सोमवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या विज रोहित्राला अचानक आग लागली आगीचे वृत्त शेजारी राहत असलेल्या शेतकऱ्याला समजल्यानंतर त्यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलवले घटनास्थळी धावलेल्या शेतकरी जगन्नाथ गूठे, सचिन गुठे, देविदास ससाने, दिनेश मुंडे ,यादव गुठे ,सचिन ससाने ,संजय कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी विज रोहित्राच्या आजू बाजूला काढून ठेवलेला हरभरा पिकाचे ढीग बाजूला करून संभाव्य नुकसान टाळले झालेल्या घटनेची माहिती देविदास ससाने यांनी या भागाचे लाईनमेन अब्दुल खय्युम यांना दिली.

तेही तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी या वीज रोहित्रा वरील वीज पुरवठा खंडित केला घटनेची माहिती मिळाल्यानंतर कनिष्ठ अभियंता एस. एस. धकाते यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत वीज वितरण कंपनीचे जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज काढण्यात आला तर काही प्रमाणात शेतकऱ्याच्या हरभरा पिकाचे ही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT