file photo
file photo 
मराठवाडा

राष्ट्रीय पातळीवरील गणित संशोधनात हिंगोलीतील शिक्षकाचा सहभाग, अरुण बैस यांना बिईएसटीईएम फेलोशिप 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार (पूर्वीचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय) आणि मुंबई येथील सेंटर ऑफ एक्सिलेन्स इन सायन्स व होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स यांच्यातर्फे देशातील २४ शिक्षकांना जून २०१९ मध्ये बिईएसटीईएम फेलोशिप जाहीर करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथील गणित विषय सहायक अरुण बैस यांची निवड झाली होती.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील गणित शिक्षण संशोधनात हिंगोलीला सहभाग मिळाला होता.

मुंबई येथील या संस्थांकडून देशात आगामी काळात गणित विषयात होणाऱ्या संशोधनासाठी देशातील २४ व्यक्तींची निवड केली होती त्यापैकी एक अरुण बैस हे होते. डाएट हिंगोली येथे कार्यरत असताना मागील दीड वर्षात प्रचंड मेहनत घेऊन अरुण बैस यांनी 'गुणवत्तापूर्ण गणित शिक्षणासाठी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात वर्ग निरीक्षणांचे स्वरूप व महत्व' हा विषय घेऊन हे संशोधन पूर्ण केले आहे आणि 'होमी भाभा संशोधन केंद्र, मुंबई'द्वारे ते स्वीकारण्यात आलं आहे.

यावर आधारित शिफारशी केंद्रीय शिक्षण मंत्रालय (मनुष्यबळ विकास मंत्रालय) यांना पाठवल्या जाणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील संशोधनात हिंगोलीला भक्कम सहभाग मिळाला आहे.जिल्ह्यातील शिक्षकाला राष्ट्रीय पातळीवरील संशोधनात सहभाग मिळाल्यामुळे संस्थेचे प्राचार्य भा.भ.पुटवाड, वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या सह जिल्ह्यातील शिक्षक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT