विघ्नहर्ता चिंतामणी
विघ्नहर्ता चिंतामणी sakal
मराठवाडा

हिंगोली: विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे बाहेरून दर्शन

राजेश दारव्हेकर

हिंगोली: नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गड्डीपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. मात्र, या गणपतीच्या बाहेरून दर्शन व नवसाचे मोदक देण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होत आहे. येथे प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाविकांच्या हाकेला धावून जाणाऱ्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला प्रत्येक चतुर्थीलाही येथे भाविकांची गर्दी होते. येथे गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. नवस बोलणारे भाविक चिंतामणी जवळून नेलेल्या मोदकाची वर्षभर पूजा करतात. नवस पूर्ण झालेले भाविक अनंत चतुर्थीला एक हजार आठ मोदक वाहतात. त्यामुळे अनंत चतुर्दशीला मोदक वाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांची रिघ लागते.

या दिवशी महापूजेनंतर भाविकांना चिंतामणीला वाहिलेल्या मोदकाचे वाटप केले जाते. मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांकडून बाहेरगावांतील भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असल्याने गणेशोत्सवात भाविक नवसाचे मोदक घेऊन दर्शनासाठी येत आहेत.

दरम्यान, येथे कोरोनाचे नियम पाळत बाहेरून दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे येत आहेत. दरम्यान, यावर्षी नवसाच्या मोदकाचे येथे वाटप केले जाणार नसल्याचे रमाकांत मिस्कीन यांनी सांगितले. मिस्कीन हे १९९१ पासून स्वतंत्र नवसाचे मोदक वाटप करतात. दरवर्षी यात ते वाढ करतात. २०१९ मध्ये त्यांनी तीन लाख २५ हजार स्वतंत्र घरी तयार करून त्याचे भाविकांना वाटप केले आहे.

यावर्षी ते एक हजार आठ मोदक तयार करून मंदिरासमोर त्याचे विसर्जन करणार आहेत. यावर्षी येथे नवसाचे कोणतेही मोदक वाटप केले जाणार नसल्याचे मिस्कीन यांनी सांगितले. रविवारी (ता. १९) अनंत चतुर्थीला सकाळी साडेआठ वाजता मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कावड निघणार आहे. कयाधू नदीचे पाणी आणून चिंतामणी गणपतीला जलाभिषेक व दुग्ध अभिषेक केला जाणार आहे. नंतर मानाचे २१ सोवळे, मानाचे डोळे तसेच सुवर्णलंकार पुजा केली जाणार आहे. मात्र हा कार्यक्रम मोजक्या भाविकांची उपस्थिती राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Amit Shah Fake Video Case : रेवंथ रेड्डींचे वकील दिल्ली पोलिसांसमोर हजर; दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT