Money Fraud
Money Fraud sakal
मराठवाडा

हिंगोली : पैसे रस्त्यावर पडल्याचे सांगत साडेचार लाख केले लंपास

सकाळ वृत्तसेवा

वसमत : पैसे रस्त्यावर पडल्याचे सांगून एका दुचाकीस्वाराला भामट्यांनी साडेचार लाखांना गंडविले आहे, ही घटना वसमत शहरातील गवळी मारुती मंदिराजवळ घडली आहे. या प्रकरणी ता. १ जुलै रोजी रात्री उशिरा वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील विरेगाव येथील शेतकरी विठ्ठल बोंढारे हे शुक्रवारी सकाळी वसमत येथे आले होते. एका मित्राकडून हात उसने घेतलेले साडेचार लाख रुपये परत देण्यासाठी त्यांनी घरून येतानाच दोन लाख रुपये आणले. तसेच काही दागिने देखील सोबत आणले होते. सदरील दागिने त्यांनी वसमत येथे अडीच लाख रुपयांना विक्री केले.

दरम्यान, घरून आणलेले दोन लाख रुपये व दागिने विक्री करून आलेले अडीच लाख रुपये असे एकूण साडेचार लाख रुपये त्यांनी दुचाकीच्या इंधन टाकीवर असलेल्या कव्हरमध्ये ठेवले होते. मित्राला पैसे देण्यासाठी ते निघाले असताना वसमत येथील बोळ रस्ता भागात एका व्यक्तीने त्यांच्या दुचाकीजवळ येत श्री. बोंढारे यांना पैसे पडल्याचे सांगितले. नंतर बोंढारे दुचाकीवरून उतरून रस्त्यावर पैसे पाहत असताना चोरट्याने दुचाकीवरील साडेचार लाख रुपये, एटीएम कार्ड, बँक पासबुक पळवले. या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या बोंढारे यांनी तातडीने वसमत शहर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक महिपाळे, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार सय्यद, भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. या प्रकरणी बोंढारे यांच्या तक्रारीवरून दोन चोरट्यांविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT