कृषीमंत्री दादा भुसे sakal
मराठवाडा

हिंगोली : महिलांनी लघु उद्योग सुरू करून स्वावलंबी बनावे; कृषिमंत्री भुसे

कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन

राजेश नागरे

औंढा नागनाथ: प्रत्येक महिला बचत गटाला बँकेमार्फत कर्ज दिले जाईल. त्यामुळे महिलांनी बचत गटामार्फत बँकेतून कर्ज घेऊन लघु उद्योग सुरु करावा आणि त्यातून स्वावलंबी बनावे, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. २१) केले. गोळेगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित महिला शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.अशोक ढवण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील, तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, जिल्हा परीषद सदस्य अकुंश आहेर, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता दिगंबर पोतरे, प्राचार्य डॉ भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. भुसे म्हणाले की, महिलांनी बचत गटामार्फत लघु उद्योग सुरु करावा व महिलांना बाजार पेठेमध्ये लघु उद्योगातून तयार केलेला माल विक्रीसाठी स्वतंत्र जागा दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतामधील वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीच्या कडेला काटेरी झाडे लावून वन्य प्राण्यांपासून आपले पीक वाचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच बँकेमध्ये बचत गटाच्या महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष वाघमारे यांनी केले तर प्रा. पुंडलीक वाघमारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT