hingoli 
मराठवाडा

Hingoli: यलो मोझॅकचा सोयाबीनवर हल्‍ला ; शेतकरी संकटात; उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मध्यंतरी पावसाचा सुमारे वीस ते २२ दिवस खंड पडला होता.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

हिंगोली - जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पडलेल्या रोगामुळे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

यावर्षी सुरुवातील उशिरा पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर सोयाबीन पिकावर गोगलगायींचे संकट आले. हे संकट संपत नाहीत, तोच पुन्हा यलो मोझॅकने सोयाबीनवर हल्ला चढवला.

या सर्व कारणांमुळे सोयाबीनच्या पीक वाढले, शेंगाही आल्या. परंतु, त्या भरल्या नाहीत. उत्पन्नच होणार नसल्याने अनेकांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली. जोमात आलेल्या

सोयाबीनवर यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाने हल्ला चढवल्याने पीक पिवळे पडून करपले आहे. या सततच्या रोगराईमुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यातील अनेक गावांत सध्या सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा अट्याक मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मध्यंतरी पावसाचा सुमारे वीस ते २२ दिवस खंड पडला होता. नंतर झालेल्या पावसात जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस पीक आडवे झाले. तर, जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील अनेक गावांत कमी पाऊस झाल्याने या भागात पावसाची गरज आहे.

यावर्षी सुरवातीला अपुरा पाऊस झाला. नंतर पावसाचा खंड, परत अति पाऊस. यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले. सध्या सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

शिवाजी कऱ्हाळे, शेतकरी, डिग्रस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT