Hivra Chondhala Paithan Taluka esakal
मराठवाडा

Navratri: गावात एकही विवाह सोहळा होत नाही, गावकरी पलंगावर झोपत नाहीत, काय आहे कारण? जाणून घ्या रेणुका मातेच्या प्रसिद्ध मंदिराबद्दल

Hivra Chondhala Paithan taluka : चौंढाळा येथे महिनाभरापूर्वीच नवरात्र उत्सवाची तयारी सुरू होते. मंदिराची रंगरगोटी, विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

-अनिल गाभुड

विहामांडवा : हिवरा चौंढाळा (ता. पैठण) येथे श्रीक्षेत्र माहूरगडावरील रेणुकामातेचं (Renukamata Temple) उपपीठ आहे. इतर देवस्थानांच्या तुलनेत येथे काही घालून दिलेल्या प्रथा, रुढी परंपरांचे येथील सर्वधर्मीय समाज आजही काटेकोरपणे पालन करतात. येथील देवी ही कुमारिका असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे चोंढाळा गावात लग्न समारंभ न करता वेशीबाहेर गावाला लागून असलेल्या विहामांडवा शेत शिवारातील मारुती मंदिर परिसरात पार पडतात.

विशेष म्हणजे, रेणुकामाता ही बाजेवर निद्रा करते. या आख्यायिकेमुळे येथील ग्रामस्थ बाज, पलंग, दिवाण झोपण्यासाठी कधीच वापरत नाहीत. घरामध्ये तयार केलेल्या सिमेंट किंवा मातीच्या ओट्याचा वापर झोपण्यासाठी केला जातो, ही परंपरा आजतागायत सुरूच आहे.

गावच्या वेशीबाहेरच होतात लग्न समारंभ

गावातील देवीच्या मंदिराला कळस नाही. त्यामुळे मंदिरापेक्षा उंच घर किंवा दुमजली घर येथे बांधण्यात येत नाही. त्यामुळे एकही दुमजली घर नाही. रेणुकामातेचा विवाह करण्याचा घाट एका राक्षस राजाने (राक्षसी वृत्ती) घातला होता. तेव्हा देवदेवतांना प्रश्न पडला होता की, या राक्षसाबरोबर रेणुकेचा विवाह झाला तर अनर्थ होईल, अराजकता माजेल तेव्हा हा होणारा विवाह होता कामा नये. तोपर्यंत इकडे चोंढाळा येथे विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. वऱ्हाडी स्थळी आले, तोपर्यंत तिथे उपस्थित वऱ्हाडी शेवटची घटका मोजत होते. त्याच वऱ्हाडी मंडळींचा पाण्याअभावी मृत्यू होऊन दगडी शिळेत रूपांतर झाले.

Hivra Chondhala Paithan taluka

गावात देवीच्या मंदिराशिवाय कोणतेच मंदिर नाही

हिवरा चौंढाळा येथे रेणुकादेवीच्या मंदिराशिवाय दुसरे कोणतेच मंदिर गावात नाही. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. दहाव्या दिवशी दसरा सणाने सांगता होते. दरवर्षीप्रमाणे सध्या मंदिर परिसरात यात्रा भरलेली असून रोज हजारोंच्या संख्येने भाविक येऊन दर्शन घेत आहेत.

रेणुका मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच समोर गाभाऱ्यातील रेणुकामातेचा भव्य तांदळा असून चोंढाळा देवी, रेणुकामाता, जगदंबा देवी, अशा विविध नावाने ही देवी ओळखली जाते. नवरात्री व चैत्र पौर्णिमेला अशी वर्षांतून दोनदा येथे यात्रा भरते. या दोन्ही सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT