Udgir sakal
मराठवाडा

Udgir : उदगीर पोलिस ठाण्यातील ‘बळीचा बकरा’ कोणाचा? ; गृहमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकड कापल्याचा प्रकार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकड कापल्याचा प्रकार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कारवाई होईल, असे त्यांनी बुधवारी मुंबई येथे माध्यमांना सांगितले.

सोशल मीडियावर येथील पोलिस ठाण्याच्या गेटवर बकऱ्याचा बळी दिल्याचा फोटो व्हायरल झाला होता. गुन्हेगारी कमी करण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा होती. पण याबाबत अशी माहिती समोर येत आहे, की एका पोलिस अधिकाऱ्याने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले होते. त्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हा बोकड कापून पार्टी करण्यात आली.

विशेष म्हणजे या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करून मलकापूर येथील एका राजकीय व्यक्तीच्या फार्महाऊसवर अधिकारी व पोलिसांनी ताव मारला. हा प्रकार सामुदायिक असल्याचे दिसून येत आहे. याची गृहखात्याने दखल घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले, की यात सहभागी असलेले दुय्यम अधिकारी व कर्मचारी जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT